हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अधिकारी सद्बुद्धीसाठी 101 नारळ! वाशिम पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

On: December 31, 2025 8:05 AM
Follow Us:
वाशिम पंचायत समिती कार्यालयासमोर 101 नारळ फोडून शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

वाशिम | प्रतिनिधी : नारायणराव आरू पाटील

वाशिम पंचायत समिती आंदोलन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.
वाशिम पंचायत समिती आंदोलन अंतर्गत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने
पंचायत समिती कार्यालयासमोर 101 नारळ फोडून अनोखे आंदोलन केले.
विहीर, घरकुल, गोठा, फळबाग व नरेगा अंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याने
वाशिम पंचायत समिती आंदोलन अधिक तीव्र झाले असून
वाशिम पंचायत समिती आंदोलन शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत दर्शवत आहे.

लाभार्थ्यांनी अनेक वेळा पंचायत समिती कार्यालयाच्या चकरा मारल्या,
पायपीट केली, मात्र तरीही अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही.
यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पंचायत समिती कार्यालयात
खाजगी एजंटमार्फत पैशाची देवाण-घेवाण करूनच कामे केली जात आहेत.
ज्यांनी पैसे दिले त्यांनाच लाभ दिला जातो, तर प्रामाणिक लाभार्थ्यांना
डावलले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनावेळी करण्यात आला.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी
“अधिकाऱ्यांना तरी सद्बुद्धी यावी” या भावनेतून
101 नारळ फोडून हे अनोखे आंदोलन केले.
रखडलेले विहीर, घरकुल, गोठा, फळबाग व नरेगा अंतर्गतचे
सर्व अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे,
अशी ठाम मागणी करण्यात आली.

हे पण वाचा..

रिसोडमध्ये हॉटेल मजुराची गळफास घेऊन आत्महत्या; समर्थ नगर परिसरात खळबळ.

या आंदोलनावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे,
युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे,
संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.


📢 जनहिताच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या बातम्यांसाठी Kattanews.in फॉलो करा

महाराष्ट्रातील ग्रामीण, शेतकरी आणि प्रशासनाशी संबंधित
विश्वासार्ह व प्रभावी बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी
आजच Kattanews.in ला भेट द्या.

🔗 संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

Leave a Comment