हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चारित्र्याच्या संशयातून राक्षसी कृत्य! मेहकरमध्ये झोपेत असलेल्या पत्नी व 4 वर्षांच्या चिमुकल्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून

On: December 29, 2025 8:06 PM
Follow Us:
मेहकर शिक्षक कॉलनीत चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी पोलिस तपास
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मेहकर/कट्टा न्यूज नेटवर्क 

मेहकर हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मेहकर शिक्षक कॉलनीतील दुहेरी हत्या प्रकरणात चारित्र्याच्या संशयातून पतीनेच झोपेत असलेल्या पत्नी व अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मेहकर हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या भावना हेलावून गेल्या आहेत.

ही घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक १ मध्ये रविवारी रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) आणि तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के (वय ४) यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी पती राहुल हरी म्हस्के (वय ३५) यास मेहकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राहुल म्हस्के हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी रात्री घरातील सर्व सदस्य झोपेत असताना, आरोपीने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून पत्नी रूपाली व मुलगा रियांश यांच्या डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

आरडाओरड ऐकून आरोपीची आई ताराबाई म्हस्के बाहेर आली असता घरातील रक्तरंजित दृश्य पाहून त्यांनी मदतीसाठी हाक दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने रूपाली यांना प्रथम मेहकर ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपीने चार वर्षीय रियांशला घरातील खोलीत बंद करून ठेवले होते. दरवाजा उघडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या रियांशला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी.

चार वर्षांचा निष्पाप रियांश या कौटुंबिक संशयाचा बळी ठरल्याने संपूर्ण मेहकर शहर हळहळले आहे. घरगुती संशय व मानसिक अस्थैर्याचे किती भीषण परिणाम होऊ शकतात, याचे हे विदारक उदाहरण ठरले आहे.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment