हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अतिवृष्टी, कर्जाचा फास अन् संपलेली आशा; भानापूरच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

On: December 29, 2025 8:27 AM
Follow Us:
भानापूर शेतकरी आत्महत्या अतिवृष्टी कर्जबाजारीपणा

विनायक कुटे/प्रतिनिधी 

सुलतानपूर : भानापूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या तणावामुळे अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही भानापूर शेतकरी आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

अर्जुन आव्हाळे यांच्याकडे सुमारे ५८ गुंठे शेती होती. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे बँक कर्जासह खासगी उसनवारीची परतफेड अशक्य बनली होती. याच कारणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते.दरम्यान, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या स्वतःच्या शेतातील गोठ्यात त्यांनी विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अर्जुन आव्हाळे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमुकल्या मुलाच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.


👉 वाचकांसाठी आवाहन

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावाखाली असेल, तर तातडीने मदत घ्या. आत्महत्या हा उपाय नाही.


हे पण वाचा..


Follow Us

Kattanews.in – महाराष्ट्रातील नंबर १ विश्वासार्ह न्यूज वेबसाईट
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment