रिसोड प्रतिनिधी| विजय जुंजारे
अर्धवट रस्त्याच्या कामामुळे बस सेवा ठप्प ठेवण्यात आली असून यामुळे एसटी महामंडळाचा महसूलही बुडत आहे. रिसोड–मेहकर बस सेवा ठप्प असतानाही ठेकेदार आणि MSRDC/PWD यांची ढिम्म भूमिका नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे.
रिसोड ते मेहकर दरम्यानच्या राज्य महामार्गाचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडून रस्ता एकाच बाजूने पूर्णपणे खोदून ठेवला आहे.
या धोकादायक स्थितीत एसटी बस चालवणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र असा अर्धवट आणि अपूर्ण रस्ता सोडण्याची परवानगी ठेकेदाराला कोणी दिली,
आणि MSRDC/PWD चे अभियंते नेमके काय करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
या संदर्भात रिसोड आगार व्यवस्थापकांनी स्पष्टपणे सांगितले की,
“रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बस सेवा बंद ठेवावी लागली आहे.
सध्याच्या परिस्थितीत बस चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे होईल.”
बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, महिलांना दवाखाना व बाजारासाठी,
तर वृद्ध नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
यामुळे आर्थिक भुर्दंड वाढला असून सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जनतेचे थेट सवाल
- रस्त्याचे काम वेळेत पूर्ण का झाले नाही?
- ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का होत नाही?
- MSRDC/PWD ने कामाचा दर्जा तपासला का?
- ST च्या महसूल नुकसानीला जबाबदार कोण?
जनतेच्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराला मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
जर तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून बस सेवा सुरू केली नाही,
तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
📢 आपली प्रतिक्रिया द्या
रिसोड–मेहकर बस सेवा बंद प्रकरणावर आपले मत काय?
खाली कमेंट करून प्रतिक्रिया द्या आणि ही बातमी शेअर करा.
🔗 Related News










