हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा हादरला! डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा सावळेचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू.

On: December 17, 2025 2:54 PM
Follow Us:
बुलढाणा हादरला! डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा सावळेचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू.

बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड 

१६ डिसेंबर रोजी डोंगरशेवली येथील होतकरू, हुशार आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा गणेश सावळे (वय १९) हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला असून एका निष्पाप वैद्यकीय विद्यार्थिनीचे उज्ज्वल भविष्य रस्त्यावरच संपुष्टात आले आहे.

ऋतुजा सावळे ही राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ती अथक परिश्रम घेत होती. नुकताच तिला आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ऋतुजाचे वडील गणेश सावळे यांनी मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी परदेशात शिक्षण देण्याचीही तयारी ठेवली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका क्षणात संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

या दुर्दैवी अपघातानंतर वाहतूक अराजकता, बेदरकार वाहनचालक आणि अपुरी रस्ते सुरक्षा यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका होतकरू विद्यार्थिनीचा बळी जाणे ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

ऋतुजाच्या मृत्यूने डोंगरशेवलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मित्रपरिवार, शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि नातेवाईकांनी अश्रूंनी निरोप दिला. सोशल मीडियावरही ऋतुजा सावळे दुचाकी अपघात प्रकरणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

👉 अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in वाचा

संबंधित बातम्या:

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment