हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

४ दिवसांत एकाच घरात सलग दोनदा चोरी; पहिल्यांदा सोनं-रोख लुटलं, दुसऱ्यांदा मौल्यवान साड्यांवर डल्ला

On: August 13, 2026 10:39 AM
Follow Us:
शेंदुर्जनमध्ये एकाच घरात चार दिवसांत दोनदा चोरी

शेंदुर्जन |राहुल साबळे 

एकदा चोरी झाल्यानंतर कुटुंब सावरत असतानाच अवघ्या चार दिवसांनी त्याच घराला पुन्हा चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना शेंदुर्जन येथे समोर आली आहे. वैभव भास्कर देशमुख यांच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या घरात चोरट्यांनी सलग दोनदा चोरी केली. पहिल्या घटनेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली, तर दुसऱ्या वेळी घरातील मौल्यवान साड्यांवर डल्ला मारण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली चोरी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास झाली. वैभव देशमुख यांच्या आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

यावेळी चोरट्यांनी पूजेच्या डब्यात ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे १० ग्रॅम वजनाची, ८० गहू मणी असलेली सोन्याची पोथ लंपास केली.

पहिल्या चोरीची घटना समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, या घटनेला अवघे चार दिवस होत नाहीत तोच चोरट्यांनी पुन्हा त्याच घराला लक्ष्य केले.

मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास दुसरी चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी चोरट्यांनी घरातून अंदाजे १५ ते २० हजार रुपये किमतीच्या मौल्यवान साड्या चोरून नेल्या.

एकाच घरात अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दोनदा चोरी झाल्याने देशमुख कुटुंबासह शेंदुर्जन परिसरातील नागरिकांमध्येही चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या घराला पुन्हा लक्ष्य करण्यात आल्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.

या दोन्ही घटनांचा सखोल तपास करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, त्यांना अटक करावी आणि चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच साड्या जप्त कराव्यात, अशी मागणी वैभव देशमुख यांनी केली आहे.

📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

📰 संबंधित बातम्या

राहुल साबळे

राहुल साबळे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या घडामोडींचे वृत्तांकन करतात. नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न, प्रशासनाशी संबंधित विषय आणि परिसरातील ताज्या घटनांची माहिती वाचकांपर्यंत अचूक, सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कट्टा न्यूजच्या माध्यमातून स्थानिक आवाजाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्हा बँकेचे १२ संचालक बिनविरोध

बुलढाणा जिल्हा बँकेचे १२ संचालक बिनविरोध; शिंगणे गटाचे सहकारात वर्चस्व, अजित पवार गटाची खेळी कितपत यशस्वी होणार?

बुट्टा तांड्याचा वैमानिक प्रशिक्षणार्थी स्वप्निल चव्हाण

वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले; बुट्टा तांड्याच्या २४ वर्षीय स्वप्निलचा अपघाती मृत्यू, सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय विष्णू राजेकर यांची आत्महत्या

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; रात्री घरातून निघाला, सकाळी मृतदेह आढळला

इब्राहिम बारुदवाला यांनी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांची घेतलेली भेट

उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवारांची इब्राहिम बारुदवाला यांनी घेतली सदिच्छा भेट; बुलढाण्याच्या प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

संघपाल पनाड आणि दिपक अंभोरे यांची रिपब्लिकन सेनेत नियुक्ती

रिपब्लिकन सेनेत मोठ्या नियुक्त्या; संघपाल पनाड जिल्हाध्यक्ष, दिपक अंभोरे तालुकाध्यक्ष

लोणार पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था

लोणारच्या पिंपळनेर शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था पाहून धक्का; विद्यार्थ्यांसाठी सुविधा की आजारांचे घर?

Leave a Comment