हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पहाटे ३ वाजता महसूल पथकाची धडक; सिनगाव जहांगीरमध्ये दोन टिप्पर जप्त, रेतीमाफियांमध्ये खळबळ

On: August 12, 2026 4:33 PM
Follow Us:
सिनगाव जहांगीर येथे अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले दोन टिप्पर
देऊळगाव राजा | मनोहर खंदारे  

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. सिनगाव जहांगीर येथे पहाटेच्या सुमारास चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर महसूल पथकाने धडक कारवाई केली. १० ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता झालेल्या या कारवाईत दोन्ही टिप्परमध्ये प्रत्येकी ३ ब्रास रेती आढळून आली. त्यानंतर दोन्ही टिप्पर जप्त करण्यात आले.

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. प्रशासनाच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी रेती वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच महसूल पथकाने पहाटेच्या वेळी ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान दोन्ही टिप्परमध्ये एकूण ६ ब्रास रेती आढळून आली. जप्त करण्यात आलेले दोन्ही टिप्पर पुढील दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, परमेश्वर बुरकुल, बबन काकड आणि महसूल सेवक विठ्ठल हरणे यांच्या पथकाने केली.

गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाया होत असल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. पहाटेच्या वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनाची नजर अवैध रेती वाहतुकीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून पुढील काळातही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

📢 Katta News WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हाबुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

🔴 संबंधित बातम्या

  • बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
  • महसूल प्रशासनाच्या महत्त्वाच्या कारवाया
  • अवैध रेती वाहतुकीविरोधातील कारवाई

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

विदर्भाच्या प्रवेशद्वारावर श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत

विदर्भाच्या प्रवेशद्वारावर ‘श्रीं’च्या पालखीचे जंगी स्वागत; ६० फुटी कमान, फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी!

जानेफळ नागेश्वर महादेव मंदिर चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४८ तासांत जेरबंद केले

भक्तांनी श्रद्धेने दिलेले दानही सोडले नाही; मंदिरातील दानपेटी फोडणारा ४८ तासांत जेरबंद

करमोड्याचे सरपंच दीपक उगले यांच्या मृत्यूची Buldana News

बुलढाण्यात खळबळ! ‘राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकू’चा आरोप; करमोड्याच्या सरपंचाचा मृत्यू ,आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ चर्चेत

धाडमधील दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

धाडमधील दोन सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा मोठा दणका; दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

चिखली तालुक्यात पत्नीच्या हाताला गरम सळईचा चटका दिल्याचा आरोप

ज्या हाताने जेवण वाढले, त्याच हाताला गरम सळईचा चटका; चिखली तालुक्यात धक्कादायक घटना

बुलढाण्यात काजूकतलीमध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार

काजूकतलीचा बॉक्स उघडताच धक्का! बुरशीच्या थरात चक्क जिवंत अळ्या; बुलढाण्यात FDA पथकाची रिलायन्स मॉलवर धडक

Leave a Comment