हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रातोरात गायब झाली नाफेडची तूर; शेगाव पोलिसांनी काही दिवसांत उलगडला २.६५ लाखांच्या चोरीचा गुन्हा

On: July 5, 2026 5:07 PM
Follow Us:
शेगावमध्ये नाफेडची तूर चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत, पोलिसांनी २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेगाव | विशाल गवई 

नाफेडची खरेदी केलेली तूर रातोरात चोरीला गेल्यानंतर निर्माण झालेल्या खळबळजनक प्रकरणाचा शेगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली तूर, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ६५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

व्यंकटेश नगर येथील वैभव दीपक देशमुख यांनी २८ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या गोदामामध्ये नाफेडची खरेदी केलेली तूर भरलेले २६ कट्टे ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३ कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या १३ क्विंटल तुरीची किंमत सुमारे १ लाख १४ हजार ४०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

तक्रार दाखल होताच शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामधून संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान एमएच ०४ जीसी ३४३० क्रमांकाचे वाहन चोरीसाठी वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी विजय राधेश्याम अग्रवाल (वय ३२, रा. शेगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने शेख उमरशेख जमीर (वय २३, रा. आळसणा, ता. शेगाव) याच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेली १३ क्विंटल तूर (१,१४,४०० रुपये), गुन्ह्यात वापरलेले वाहन (१,५०,००० रुपये) तसेच तूर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले १५ रिकामे कट्टे (१,५०० रुपये) असा एकूण २ लाख ६५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या सहकार्याने करण्यात आली. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


👉 वाचा अशाच विश्वासार्ह आणि वेगवान स्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी, गुन्हे, शेती, शिक्षण, राजकारण आणि सरकारी योजनांच्या अचूक व अपडेट बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.


Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा

नाना पाटेकर यांचे निधन, गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अभिनयाचा एक युग संपलं! ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांची अचानक एक्झिट; गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

Leave a comment