हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

ग्रामसेविकेला एटीएममध्ये ७० हजारांचा गंडा; कार्ड बदलून अज्ञातांनी खाते केले रिकामे, गुन्हा दाखल

On: July 2, 2026 7:54 AM
Follow Us:
मलकापूरमध्ये SBI एटीएममध्ये ग्रामसेविकेचे एटीएम कार्ड बदलून ७० हजार रुपये काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मलकापूर |प्रविण गरुडे 

एटीएममध्ये पैसे काढताना अनोळखी व्यक्तींची मदत घेणे किती महागात पडू शकते, याचे धक्कादायक उदाहरण मलकापूर येथे समोर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या एटीएममध्ये ग्रामसेविकेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून अज्ञातांनी तिच्या खात्यातून तब्बल ७० हजार रुपये काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. अर्चना रामराव माहुरे (वय ३०), व्यवसाय ग्रामसेविका, रा. रामवाडी, मलकापूर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्या २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजता शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या.यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी “तुमचे ट्रान्झॅक्शन पूर्ण झाले नाही” असे सांगून पुन्हा एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकण्यास सांगितले. या दरम्यान आरोपींपैकी एका व्यक्तीने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून दुसरे कार्ड दिले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

त्यानंतर काही वेळातच वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांच्या खात्यातून एकूण ७० हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ४८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२) व ३(५) अंतर्गत दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना एटीएम वापरताना अनोळखी व्यक्तींची मदत न घेण्याचे, एटीएम कार्ड व पिनची गोपनीयता राखण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तातडीने संबंधित बँक आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


Related News


हे आवश्यक करा

अशाच विश्वासार्ह, सर्वात जलद आणि  महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

 

प्रवीण गरुडे

प्रवीण गरुडे हे Kattanews.in चे अनुभवी प्रतिनिधी असून ग्रामीण, सामाजिक, शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांचे अचूक व विश्वासार्ह वार्तांकन करतात. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवर आधारित बातम्या सादर करणे ही त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सत्यता, वेग आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देत ते सातत्याने वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment