हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रेती माफियांचा पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; साखरखेर्ड्यात निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी

On: May 24, 2026 7:54 AM
Follow Us:
रेती माफियांच्या हल्ल्यानंतर पत्रकार रामदास कहाळे प्रकरणावर साखरखेर्ड्यात निषेध

बुलढाणा |समाधान सरकटे 

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी-दुसरबीड परिसरात अवैध रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर कथित रेती माफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पत्रकार क्षेत्रातून संताप व्यक्त होत असून साखरखेर्डा येथे पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, राहेरी येथे ग्रामस्थ अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले युट्यूब चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार रामदास कहाळे हे टिप्परचे फोटो घेत असल्याचा राग आल्याने काही अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गावगुंडांनी तसेच संबंधित ठेकेदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या घटनेच्या निषेधार्थ २२ मे रोजी साखरखेर्डा येथे पत्रकार संघटनांनी एकत्र येत ठाणेदार गजानन करेवाड यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. निवेदनात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे समाजातील भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्याचे काम करत असतात. मात्र, अलिकडच्या काळात पत्रकारांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असून त्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनाद्वारे पत्रकार संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करणे, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल करणे, जलदगती न्यायालयात खटला चालविणे तसेच कर्तव्य बजावताना पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

यासोबतच, २४ तासांच्या आत आरोपींवर ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पत्रकार संघटनांनी प्रशासनाला दिला आहे.

सदर निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे, दिलीप नाईकवाड, डी.एन. पंचाळ, सचिन खंडारे, प्रतापराव मोरे, प्रल्हाद देशमुख, पवन मगर, जुबेर शहा, विजय देशमुख, भगवान साळवे, अमोल साळवे, समाधान सरकटे, एस.पी. शिंगणे, डॉ. गंगाराम उबाळे, समाधान मस्के पाटील आणि गणेश पंजरकर यांच्या सह्या आहेत.


Related News


Join Katta News WhatsApp Channel : स्थानिक ते राज्यातील सर्व मोठ्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी KattaNews.in सोबत जोडलेले रहा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

खामगावातील पेट्रोल पंपावर तलवार आणि कोयत्यासह आरोपींकडून दहशत

कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याने तलवार-कोयत्यासह पेट्रोल पंपावर दहशत; कर्मचाऱ्यांना मारहाण

बुलढाण्यात हरभरा भरलेला ट्रक गायब प्रकरणात LCB ने ५ आरोपींना अटक केली

२७० क्विंटल हरभरा घेऊन ट्रक गायब! बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई; ५ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंदखेडराजा येथे LIVE वार्तांकन करताना पत्रकारावर हल्ला झाल्याचा आरोप

वाळू माफियांविरोधात LIVE वार्तांकन करताना पत्रकाराला मारहाण? दोषींना अटक करा, नाहीतर आंदोलन — पत्रकार संघटनांचा अल्टिमेटम

अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी जप्त केलेली पिस्तूल, काडतुसे आणि XUV500 वाहन

बुलढाण्यात रायपूर पोलिसांची मोठी कारवाई; 2 पिस्तूल, 94 काडतुसे आणि XUV500सह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

कंडारी गावातील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

जलजीवन मिशनचा फज्जा! काम पूर्ण दाखवलं, पण कंडारी गाव अजूनही पाण्याविना; 20 मेपासून आमरण उपोषण

जयपूर लांडे शिवारातील तलावात पोहताना गाळात अडकलेल्या मुलाची घटना

पोहण्याचा मोह मुलाच्या जिवावर बेतला; तलावातील गाळात फसल्याने मृत्यू

Leave a Comment