हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याने तलवार-कोयत्यासह पेट्रोल पंपावर दहशत; कर्मचाऱ्यांना मारहाण

On: May 23, 2026 11:02 AM
Follow Us:
खामगावातील पेट्रोल पंपावर तलवार आणि कोयत्यासह आरोपींकडून दहशत

बुलडाणा|विशाल गवई

खामगाव-अकोला रोडवरील एका पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून काही तरुणांनी थेट तलवार आणि कोयते घेऊन पेट्रोल पंपावर धडक दिली. आरोपींनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी चौघांविरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनांनी पुन्हा एकदा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. खामगाव-अकोला रोडवरील के. के. पेट्रोल पंपावर कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याच्या कारणावरून काही तरुणांनी थेट तलवार आणि कोयते घेऊन धडक दिली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे परिसरात मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ही धक्कादायक घटना २१ मेच्या रात्री खामगाव-अकोला रोडवरील के. के. पेट्रोल पंपावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जाधव आणि त्याच्यासोबत एक अनोळखी युवक पेट्रोल पंपावर आले होते. त्यांनी कॅनमध्ये पेट्रोल भरण्याची मागणी केली. मात्र पेट्रोलचा केवळ अत्यावश्यक साठा उपलब्ध असल्याने कॅनमध्ये पेट्रोल देता येणार नसल्याचे पेट्रोल पंप मॅनेजर सागर अवचार यांनी स्पष्ट केले.

याच कारणावरून आरोपी संतप्त झाले. सुरुवातीला त्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव आणि आणखी एक अनोळखी इसम हे हातात तलवार आणि कोयते घेऊन पुन्हा पेट्रोल पंपावर आले. आरोपींनी दहशत माजवत कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “जीव घेऊ” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पेट्रोल पंप मॅनेजर सागर अवचार यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ४/२५ आर्म ॲक्टसह भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव पोस्टेचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किरण राऊत करीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे खामगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या


आपल्या भागातील बातमी आम्हाला पाठवा

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, अपघात, सामाजिक, राजकीय किंवा गुन्हेगारी बातम्या आम्हाला पाठवण्यासाठी Kattanews.in शी संपर्क साधा. तुमची बातमी राज्यभर पोहोचवण्याचे व्यासपीठ.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

शेगावमध्ये नाफेडची तूर चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत, पोलिसांनी २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रातोरात गायब झाली नाफेडची तूर; शेगाव पोलिसांनी काही दिवसांत उलगडला २.६५ लाखांच्या चोरीचा गुन्हा

हिवरा आश्रम येथे दिवसाढवळ्या घरफोडीत ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीला; तपासासाठी घटनास्थळी पोलीस, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ

हिवरा आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ! १२ दिवसांत तिसरी चोरी; दिवसाढवळ्या घरफोडीत ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार स्वीकारताना आंबेवाडीच्या सुनिता भानुदास आव्हाड

गुलाब शेतीत घडवली यशोगाथा! आंबेवाडीच्या सुनिता आव्हाड यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार

कर्तव्यावर निघालेल्या बुलढाणा आगारातील एसटी चालक रमेश उबरहंडे यांचा बोलेरोच्या धडकेत मृत्यू

कर्तव्यावर निघालेल्या एसटी बसचालकाचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव बोलेरोची जोरदार धडक

लोणार येथे शाहीर कृष्णकांत जोशी बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत जनाबाई महिला मंडळातील महिला लोककलावंतांचा शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.

लोणारमध्ये महिला लोककलावंतांचा गौरव; शाहीर कृष्णकांत जोशी संस्थेकडून शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप

मलकापूरमध्ये SBI एटीएममध्ये ग्रामसेविकेचे एटीएम कार्ड बदलून ७० हजार रुपये काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ग्रामसेविकेला एटीएममध्ये ७० हजारांचा गंडा; कार्ड बदलून अज्ञातांनी खाते केले रिकामे, गुन्हा दाखल

Leave a Comment