हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

२७० क्विंटल हरभरा घेऊन ट्रक गायब! बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई; ५ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: May 23, 2026 9:06 AM
Follow Us:
बुलढाण्यात हरभरा भरलेला ट्रक गायब प्रकरणात LCB ने ५ आरोपींना अटक केली

बुलढाणा |विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात घडलेल्या हरभरा अपहार प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाकडे पाठविण्यात आलेला तब्बल २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक अचानक गायब झाल्यानंतर पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत ५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हरभऱ्यासह एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील थड येथील ‘संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी’ या नाफेड सेंटरवरून १२ मे रोजी लकी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रक क्रमांक एमएच-४३-यू-५२९० मध्ये २७० क्विंटल हरभरा भरून मलकापूर येथील वखार महामंडळाकडे रवाना करण्यात आला होता. या हरभऱ्याची बाजारमूल्य तब्बल १५ लाख ८६ हजार २५० रुपये इतकी होती.मात्र संबंधित ट्रक नियोजित ठिकाणी पोहोचलाच नाही. ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून माल परस्पर गायब केल्याचे उघड झाल्यानंतर संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र आनंदराव जंगले यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये आणि त्यांच्या टीमने तब्बल २०० ते ३०० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने ट्रकचा माग काढत अखेर ट्रक चालक शेख आमीन शेख जमील याला मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी चौकशी सुरू करताच चालकाने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींनी तेल्हारा, जिल्हा अकोला येथे हरभरा विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हरभरा आणि इतर मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात शेख आमीन शेख जमील (वय ३३), शेख समीर शेख सलीम (वय २७), शेख सादीक शेख नूरमोहम्मद (वय २४), मो. मुस्तकीन मो. मुशीर शेख (वय ३४) आणि सोहील खान उर्फ शोएब युन खान (वय २३) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे मलकापूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सध्या आरोपींना धाड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे हरभरा अपहार प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगाव अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉं. दिपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, विजय पैठणे, गजानन गोरले, विकास देशमुख, निवृत्ती पुंड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे यांनी ही कारवाई यशस्वी केली.


📌 Related News


📲 हे आवश्यक करा..

बुलढाणा, महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वात वेगवान ब्रेकिंग न्यूज, गुन्हेगारी अपडेट, राजकीय घडामोडी आणि शेतीविषयक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक निवडणुकीत 94 टक्के मतदान

Buldhana News: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी 94% मतदान; आज निकाल, कोण बाजी मारणार ? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

Chikhli Buldhana News पिस्टलसह सराईत गुन्हेगार ताब्यात

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! सराईत गुन्हेगार पिस्टलसह ताब्यात; ₹45 हजारांचे अग्नीशस्त्र जप्त

शिंदीच्या निलेश खरात यांची कतार एअरवेजमध्ये निवड

शिंदीच्या छोट्या गावातून थेट कतार एअरवेजमध्ये झेप; निलेश खरातने मेहनतीच्या जोरावर साकारले आकाशात उडण्याचे स्वप्न

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा एल्गार; २७ ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून लिलावाचा इशारा

Buldhana News घरकुल लाभार्थी यादीवर हरकत सिंदखेड राजा

Buldhana News: घरकुल लाभार्थी यादीवर हरकत; सिंदखेड राजा तालुक्यात सखोल चौकशीची मागणी

Maharashtra News सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी तुकाराम मुंढे

खाद्यतेल विक्रीबाबत मोठा निर्णय! तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; सुटे तेल विकण्यास बंदी, नियम मोडल्यास कठोर कारवाई

Leave a Comment