बुलढाणा | प्रतिनिधी
राज्यात सध्या भोंदू खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, अंधश्रद्धा आणि जादूटोणा कायद्याची अंमलबजावणी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. बुलढाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी थेट फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत “भोंदू बुवा बाबांचे प्रस्थ वाढण्यामागे सरकारचे मूक समर्थन आहे” असा स्फोटक दावा केला.
‘इतर बुवा बाबांवर कारवाई का नाही?’ – दुहेरी निकषांवर सवाल
श्याम मानव यांनी स्पष्टपणे विचारले की, भोंदू खरातवर कारवाई झाली हे योग्य असले तरी इतर प्रसिद्ध बुवा बाबांवर कारवाई का होत नाही? त्यांनी धीरेंद्र शास्त्री, प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर यांसारख्या नावांचा उल्लेख करत सांगितले की, कायदा सर्वांसाठी समान असावा. काहींवर कठोर कारवाई आणि काहींना मोकळीक, असा दुहेरी निकष समाजात चुकीचा संदेश देतो.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी अशा महाराष्ट्र गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिस स्वतंत्रपणे निर्णय घेऊन तातडीने पोलिस तपास सुरू करत आणि FIR दाखल करत. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रशासनावर वाढता दबाव दिसून येतो, ज्यामुळे कारवाई उशिरा होते किंवा काही प्रकरणे दुर्लक्षित राहतात.
जादूटोणा विरोधी कायद्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या कायद्याचा प्रभावी प्रचार आणि जनजागृती झाली असती, तर अशा घटना टाळता आल्या असत्या. ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा गैरफायदा काही लोक घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणात काही राजकीय संबंधांचाही मुद्दा पुढे येत आहे. श्याम मानव यांनी सूचक शब्दांत सांगितले की, काही मोठ्या नेत्यांशी असलेली जवळीक आणि पूजा प्रकरण यामुळेच या प्रकरणाकडे उशिरा लक्ष गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा निष्पक्ष आणि सखोल पोलिस तपास होणे गरजेचे आहे.
रूपाली चाकणकर देखील आरोपीच !
रूपाली चाकणकर यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, एका पत्रकाराला दिलेल्या कथित धमकीमुळे या प्रकरणात नवे वळण आले आहे. आरोपीला मदत करणे हा देखील गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे या बाबतीतही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांचा सहभाग तपासला पाहिजे.
खरात वर ॲक्शन होण्याचे पुन्हा एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी असलेली जवळीक असू शकते. त्याचे संबंध कसे आहे हा पोलिस तपासाचा भाग आहे.भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष प्रकरणाकडे गेले व खरात वर कारवाई झाली असे श्याम मानव पत्रकार परिषदेत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात वाढणारी अंधश्रद्धा, बुवा बाबांचे प्रस्थ आणि प्रशासनावर वाढणारा दबाव यामुळे समाजात गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
📌 Related News
- मंत्री बावनकुळेंचा तडकाफडकी निर्णय! चिखली प्रांत अधिकारी सक्तीच्या रजेवर, बुलढाण्यात खळबळ – नेमकं काय घडलं?
- धक्कादायक! वाशिममध्ये भरधाव ‘थार’चा कहर, ७ वाहनांचा चुराडा – ४ जण गंभीर
- बुलढाण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ, प्रशासन सतर्क
📢 हे आवश्यक करा..
अशाच ब्रेकिंग आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.










