हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा भंडाफोड! १५ कर्मचारी सस्पेंड

On: March 23, 2026 9:37 AM
Follow Us:
बुलढाणा दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा १५ कर्मचारी निलंबित

बुलढाणा |२३ मार्च २०२६

जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेत १५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड पडताळणी सुरू करण्यात आली होती.

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आला. काही प्रकरणांमध्ये प्रमाणपत्रांबाबत गंभीर संशय निर्माण झाला. संबंधित १५ कर्मचाऱ्यांना १२ मार्च रोजी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र वारंवार संधी देऊनही ते अनुपस्थित राहिल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये १२ शिक्षक, २ ग्रामसेवक आणि १ परिचर यांचा समावेश आहे. युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड काढण्याची अंतिम मुदत जून २०२५ असूनही नियमांचे पालन न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून संबंधितांना वैद्यकीय मंडळामार्फत पुनर्पडताळणीची संधी देण्यात येणार आहे. चुकीची प्रमाणपत्रे स्वेच्छेने जमा केल्यास पुनर्नियुक्तीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बोगस लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

पात्र दिव्यांगांना न्याय मिळावा आणि शासनाच्या योजनांचा गैरवापर थांबावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कारवाईचा तपशील :
एकूण तपासणीतील कर्मचारी – ५५
निलंबित कर्मचारी – १५
शिक्षक – १२
ग्रामसेवक – २
परिचर – १


Related News


👉 अधिक अपडेट्ससाठी Kattanews.in ला भेट देत रहा

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment