हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भेसळयुक्त खवा-पनीर विक्रेत्यांवर बुलढाण्यात मोठी कारवाई! जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

On: March 23, 2026 7:24 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यात भेसळयुक्त खवा आणि बनावट पनीर विक्रेत्यांवर कारवाई

बुलढाणा | २३ मार्च २०२६

जिल्ह्यात भेसळयुक्त खवा आणि पनीर विक्रीच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासन सतर्क झाले असून भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. भेसळयुक्त खवा, बनावट पनीर आणि पाम तेलापासून तयार होणाऱ्या पदार्थांमुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या उत्पादक आणि पुरवठादारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले.अलीकडील तपासात बाजारपेठेत पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर वापरून तयार केलेले पदार्थ ‘खवा’ म्हणून विकले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच ‘चीज अॅनालॉग’ नावाचा पदार्थ ‘चीज’ म्हणून ग्राहकांना विकला जात असल्याचेही आढळले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

हे बनावट पदार्थ प्रामुख्याने गुजरात राज्यातून १० किलोच्या पॅकेजमध्ये ‘स्पेशल बर्फी’ किंवा ‘हलवा’ या नावाने बाजारात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नियमांनुसार अशा पदार्थांवर त्यातील घटकांची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक असतानाही अनेक विक्रेते ही माहिती लपवत असल्याचे समोर आले आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई विक्रेत्यांनी आपल्या मेनू कार्डवर अशा पदार्थांची स्पष्ट नोंद करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अन्नपदार्थ खरेदी करताना लेबल, घटक आणि उत्पादनाचा प्रकार नीट तपासावा. संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.

तक्रारीसाठी हेल्पलाइन: १८००-२२२-३६५


👉 संबंधित बातम्या


📢 Call To Action

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

👉 ही बातमी शेअर करून इतरांनाही सतर्क करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

Leave a Comment