हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड पोलिसांची मोठी कामगिरी! हरवलेले 2.59 लाखांचे 12 मोबाईल शोधून मालकांना परत

Follow Us:
रिसोड पोलिसांनी हरवलेले मोबाईल मालकांना परत दिले

रिसोड | १२ मार्च २०२६

शहर व परिसरात हरवलेले मोबाईल शोधून काढत रिसोड पोलिसांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण 2 लाख 59 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले.

मोबाईल हरवल्यामुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना पोलिसांनी शोधून दिलेले मोबाईल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला. अनेक नागरिकांनी रिसोड पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

पोलीस स्टेशन रिसोड हद्दीतील शहर व ग्रामीण भागात हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तांत्रिक तपास आणि पोर्टलच्या मदतीने एकूण 12 मोबाईल फोन, ज्यांची किंमत सुमारे 2 लाख 59 हजार रुपये आहे, शोधण्यात यश मिळाले.

त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी तांत्रिक तपासणी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हरवलेले मोबाईल शोधून काढले.

मोबाईल हरवल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे (आयपीएस), अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, पोलीस अंमलदार रवि इरतकर, ज्ञानेश्वर बेले आणि रवि अढागळे यांनी ही कामगिरी केली.


Related News


हे आवश्यक करा :
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment