हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखळी बुद्रुकच्या पाणीप्रश्नावर मोठा दिलासा; आमदार संजुभाऊ गायकवाडांच्या हस्तक्षेपानंतर आमरण उपोषणाची सांगता

On: June 15, 2026 7:00 AM
Follow Us:
साखळी बुद्रुक येथे पाणीप्रश्नावरील आमरण उपोषणाची सांगता करताना युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड

चिखली : विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील साखळी बुद्रुक गावात गेल्या काही दिवसांपासून तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावातील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची शनिवारी युवानेते तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत तातडीच्या उपाययोजना सुरू केल्यानंतर आणि मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

साखळी बुद्रुक गावात अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. गावकऱ्यांना नियमित व स्वच्छ पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सौ. विजयाताई अनिल कोळसे यांच्या नेतृत्वाखाली महिला व ग्रामस्थांनी १० जून २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते.

उपोषणकर्त्यांनी सक्तीचा पाणीकर रद्द करावा, प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, प्रत्येक घराला पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी मिळावे, पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, एका वर्षाचा पाणीकर माफ करावा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या अंदाजे ५ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीची चौकशी करावी, अशा विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या होत्या.

याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत वसूल करण्यात आलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली होती. या मागण्यांमुळे आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.

उपोषणाची माहिती मिळताच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. गावातील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने साखळी बुद्रुक गावासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली.

आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या सूचनेनुसार १२ जून रोजी रात्री गावात पाण्याचे टँकर दाखल झाले. त्यानंतर नागरिकांना तातडीने पाणीवाटप सुरू करण्यात आले. अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

शनिवारी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्ते, ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गावाला नियमित पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता व्हावी आणि पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते उपोषणाची अधिकृत सांगता करण्यात आली. या प्रसंगी शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे, डॉ. कैलास उगले, संजय काळवाघे, गजानन काळवाघे, गजानन घुबे, केतन मादनकर, विलास गायकवाड, दिगंबर भोरकडे, कार्तिक दराखे, रुपेश जाधव, सुरेश जाधव, स्वप्निल हिवाळे, विशाल हिवाळे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, ग्रामस्थ, माता-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखळी बुद्रुकच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे आणि आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील आंदोलनाला यश मिळाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

📢 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा

तुमच्या गावातील घडामोडी, सामाजिक उपक्रम, अपघात, राजकीय बातम्या किंवा विशेष घटना आमच्यापर्यंत पोहोचवा. KattaNews.in आपल्या भागातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment