हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा येथील स्मशानभूमीत महिलेची आत्महत्या; संपूर्ण जळाल्याने जागीच मृत्यू

On: June 8, 2026 7:47 AM
Follow Us:
साखरखेर्डा येथील स्मशानभूमीत मृत्यू झालेल्या शारदा प्रकाश धनसरवाड यांचा फोटो

साखरखेर्डा प्रतिनिधी| समाधान सरकटे 

येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत राहणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून स्वतःला जाळून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 6 जून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्याच स्मशानभूमीत रविवारी सकाळी 11 वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत महिलेचे नाव शारदा प्रकाश धनसरवाड (वय 34) असे असून त्या मूळच्या धानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी होत्या.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

प्रकाश रमेश धनसरवाड यांचे कुटुंब स्मशानजोगी व्यवसायासाठी या भागात आले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना साखरखेर्डा येथील तीन स्मशानभूमींची स्वच्छता व वृक्षसंवर्धनाचे काम करण्याचा सल्ला दिला होता. या कामासाठी स्थानिक नागरिकांकडून त्यांना मदतही केली जात होती.

काही महिन्यांपासून हे कुटुंब साखरखेर्ड्यात वास्तव्यास होते. गावातील नागरिकांशी त्यांची चांगली ओळख निर्माण झाली होती. स्थानिक लोकवर्गणीतून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव आणि सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता संतोष मोरे यांच्या पुढाकाराने त्यांच्यासाठी छोटेसे घरही बांधून देण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी दुपारी प्रकाश धनसरवाड हे चहा आणण्यासाठी बसस्थानकावरील अनिल सोरमारे यांच्या हॉटेलवर गेले होते. त्यावेळी त्यांची मुले स्मशानभूमीतील वृक्षाखाली खेळत होती. दरम्यान, शारदा धनसरवाड यांनी घरात स्वतःला पेटवून घेतले. त्यात त्या गंभीररीत्या भाजल्याने जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला.

या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव काळे यांनी प्रकाश धनसरवाड यांच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप मेंधने करीत आहेत.


महत्त्वाची नोंद

जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील कोणाला मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असतील तर तातडीने कुटुंबीय, मित्र, डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. योग्य वेळी मिळालेली मदत जीव वाचवू शकते.


Related News


Kattanews.in वर अपडेट राहा

बुलढाणा, विदर्भ, महाराष्ट्र आणि देशातील ताज्या, विश्वासार्ह व जलद बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment