हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वडिलांनंतर खंबीर आधार देणारा देवच हरपला – आमदार मनोज कायंदे

On: January 29, 2026 11:48 AM
Follow Us:
अजितदादा पवार अपघाती निधनाच्या वृत्तावर आमदार मनोज कायंदे यांची भावनिक प्रतिक्रिया

बुलढाणा |२९ जानेवारी २०२६

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या धक्कादायक वृत्तानंतर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी अत्यंत हळव्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“ही बातमी समजताच क्षणभर विश्वासच बसत नव्हता. मनात प्रचंड घालमेल सुरू झाली होती. नियतीने जे मान्य केले, ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आमदार मनोज कायंदे म्हणाले की, दादांचे आशीर्वाद आणि मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर अजितदादा पवार हे वडिलांप्रमाणेच प्रत्येक लहान-मोठ्या बाबींचा बारकाईने आढावा घेत असत.“विकासाचा चढता आलेख कसा ठेवायचा, कामात सातत्य कसे राखायचे आणि यश कसे मिळवायचे, याचे बाळकडू दादांकडूनच मिळाले. ‘कामात सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल’ हे त्यांचे शब्द आजही कानात घुमत राहतात,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

इतकेच नव्हे, तर “विरोधकांकडूनही शिकण्यासारखे खूप काही असते, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका,” असा मोलाचा सल्ला दादांनी दिला होता, तो आयुष्यभर मार्गदर्शक ठरेल, असे कायंदे यांनी नमूद केले.

दादांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर सिंदखेडराजा मतदारसंघाचाही अपूरणीय तोटा झाल्याचे सांगत, “वडिलांनंतर मला खंबीर आधार देणारा देवच हरपला आहे,” अशा शब्दांत त्यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्तावर आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केल्या भावना

👉 अशाच राजकीय, सामाजिक व ब्रेकिंग बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा.

हे पण वाचा..

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment