हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

उत्रादा गावात जलजीवन योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह; टाकी गळतीनंतर ग्रामस्थांचे उपोषण सुरू

On: April 7, 2026 9:10 AM
Follow Us:

चिखली (बुलढाणा) :७ एप्रिल २०२६

उत्रादा गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावासाठी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची चाचणी घेताच गळती सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून 6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

माहितीनुसार, चिखली तालुक्यातील उत्रादा येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत गावाजवळील धरणातून पाणी उचलून गावात पुरवठा करण्यासाठी विहीर, पाईपलाईन आणि जलकुंभ उभारण्यात आला आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली होती.

गावात उभारण्यात आलेल्या सुमारे 50 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी भरून चाचणी घेतली असता पहिल्याच दिवशी टाकी झिरपू लागल्याचे दिसून आले. यावेळी गावातील काही नागरिक व पत्रकार उपस्थित होते. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तसेच विहिरीचे बांधकाम कमी खोलीचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाईपलाईन टाकताना योग्य खोदकाम झाले नसून जोडणीही निकृष्ट पद्धतीने केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम अर्धवट असल्याचेही निदर्शनास आले आहे.

ग्रामस्थांच्या मते, सध्या टाकीत कमी पाणी टाकल्यावरच गळती होत असेल, तर पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यास टाकी कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर कामाची सखोल चौकशी करून वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि बिल थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत या कामाची योग्य चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

👉 आपल्या भागातील अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment