हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

ॲसिडिटी वाटलं, पण ठरलं जीवघेणं! लोणारमध्ये सर्पदंशाने B.Pharmacy शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

On: April 6, 2026 4:58 PM
Follow Us:
लोणारमध्ये सर्पदंशामुळे B.Pharmacy विद्यार्थिनीचा मृत्यू

लोणार |६ एप्रिल २०२६

ॲसिडिटी वाटलं, पण ठरलं जीवघेणं! लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे घडलेली ही धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. सर्पदंश झाल्यानंतरही ॲसिडिटीचा त्रास समजून दुर्लक्ष केल्याने १९ वर्षीय B.Pharmacy शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्राप्त माहितीनुसार, रवींद्र शेषराव सानप यांची मुलगी साक्षी ही आई-वडिलांसोबत रात्री झोपलेली असताना विषारी सापाने तिला चावा घेतला. मात्र, सकाळी उठल्यानंतर तिला घशात दुखत असल्याने ॲसिडिटीसारखा त्रास होत असल्याचे वाटले.

तत्काळ तिला लोणार येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने आणि सर्पदंशाची लक्षणे स्पष्ट दिसू लागल्याने तिला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित साप शेजाऱ्याच्या अंगणात आढळून आला. साक्षी ही सुलतानपूर येथील B.Pharmacy द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण आणि मोठा आप्तपरिवार आहे.

👉 तुमच्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी kattanews.in ला फॉलो करा आणि ही बातमी शेअर करा.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment