हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोठी कारवाई! मोताळा कॉटन मार्केटमध्ये १० किलो गांजा जप्त; २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

On: April 6, 2026 8:54 AM
Follow Us:
मोताळा कॉटन मार्केट येथे पोलिसांनी १० किलो गांजा जप्त करत आरोपी ताब्यात घेतला

मोताळा | ६ एप्रिल २०२६

जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केट परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत जवळपास २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (५ एप्रिल) दुपारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉटन मार्केट परिसरात राहणारा अजय रोहिदास मोहिते (वय २१) हा विक्रीसाठी घरात गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तातडीने पोलिसांनी पथक तयार करून कारवाई केली.

ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी शेंगेपल्लु, पीएसआय राजेंद्र कपले यांच्यासह पथकाने पंचांसमक्ष घरावर छापा टाकला. या छाप्यात घरातून ९ किलो ८०० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत अंदाजे १ लाख ९६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी अजय मोहिते याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पीएसआय राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि बालाजी शेंगेपल्लु व पोलिस कर्मचारी करीत आहेत. विशेष म्हणजे, कॉटन मार्केट परिसरात गेल्या सहा महिन्यांतील गांजासंबंधी ही तिसरी मोठी कारवाई असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.

Related News

 

प्रवीण गरुडे

प्रवीण गरुडे हे Kattanews.in चे अनुभवी प्रतिनिधी असून ग्रामीण, सामाजिक, शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांचे अचूक व विश्वासार्ह वार्तांकन करतात. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवर आधारित बातम्या सादर करणे ही त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सत्यता, वेग आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देत ते सातत्याने वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment