समाधान वानखेडे/वरोडी
परमहंस तेजस्वी बाबा यांचे आज रात्री साडेनऊ वाजता तेजस्वी संस्थानमध्ये वैकुंठगमन झाले.परमहंस तेजस्वी बाबा यांच्या निधनाची बातमी समजताच परमहंस तेजस्वी बाबा यांचे असंख्य भक्त आश्रमाकडे धावले.
काही दिवसांपासून बाबांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.२८ नोव्हेंबर रोजी त्यांचा ९० वा जन्मोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता.मात्र त्यानंतर प्रकृतीत चढ-उतार सुरूच राहिले. आज अखेर रात्री साडेनऊ वाजता बाबांनी
या देहाचा निरोप घेतला.
बाबांच्या वैकुंठगमनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच वरुडी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली.
अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, तर काहीजण नतमस्तक होऊन बाबांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करत होते.
आश्रम परिसरात ‘माऊली माऊली’ आणि ‘जय जय तेजस्वी बाबा’ असा गजर ऐकू येत होता.
दरम्यान, बाबांनी काही वेळापूर्वीच भाविकांना क्षणिक दर्शन दिले होते.
ते दृश्य पाहून अनेक भाविक भावुक झाले होते.आज बाबांचे वैकुंठगमन झाल्याने तो क्षण अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे.
परमहंस तेजस्वी बाबा हे साधेपणा, सेवा आणि भक्तीचे प्रतीक होते.असंख्य भाविकांचे जीवन मार्गी लागले.बाबांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या स्मृतींना भाविक, शिष्यवृंद आणि नागरिकांकडून अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
अंत्यदर्शन व पुढील विधींबाबत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
परमहंस तेजस्वी बाबा यांना KattaNews.in परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली.
बाबांच्या आठवणी सदैव भाविकांच्या हृदयात जिवंत राहतील.
📌 तत्काळ अपडेट मिळवा
महाराष्ट्रातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मिनिटाचा अपडेट मिळवण्यासाठी आमचे नोटिफिकेशन ऑन करा.
🔎 संबंधित बातम्या












