हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

परमहंस तेजस्वी बाबा यांचे वैकुंठगमन; वरुडी येथे रात्री ९.३० वाजता अखेरचा श्वास.

On: December 13, 2025 10:58 PM
Follow Us:
परमहंस श्री तेजस्वी महाराज प्रकृती चिंताजनक – वरोडी येथील भाविकांची गर्दी

समाधान वानखेडे/वरोडी

परमहंस तेजस्वी बाबा यांचे आज रात्री साडेनऊ वाजता तेजस्वी संस्थानमध्ये  वैकुंठगमन झाले.परमहंस तेजस्वी बाबा यांच्या निधनाची बातमी समजताच परमहंस तेजस्वी बाबा यांचे असंख्य भक्त आश्रमाकडे धावले.

परमहंस तेजस्वी बाबा यांच्या वैकुंठगमनाने वरुडीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपासून बाबांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.२८ नोव्हेंबर रोजी त्यांचा ९० वा जन्मोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता.मात्र त्यानंतर प्रकृतीत चढ-उतार सुरूच राहिले. आज अखेर रात्री साडेनऊ वाजता बाबांनी
या देहाचा निरोप घेतला.

बाबांच्या वैकुंठगमनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच वरुडी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली.
अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, तर काहीजण नतमस्तक होऊन बाबांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करत होते.
आश्रम परिसरात ‘माऊली माऊली’ आणि ‘जय जय तेजस्वी बाबा’ असा गजर ऐकू येत होता.

दरम्यान, बाबांनी काही वेळापूर्वीच भाविकांना क्षणिक दर्शन दिले होते.
ते दृश्य पाहून अनेक भाविक भावुक झाले होते.आज बाबांचे वैकुंठगमन झाल्याने तो क्षण अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे.

परमहंस तेजस्वी बाबा हे साधेपणा, सेवा आणि भक्तीचे प्रतीक होते.असंख्य भाविकांचे जीवन मार्गी लागले.बाबांच्या निधनाने  मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या स्मृतींना भाविक, शिष्यवृंद आणि नागरिकांकडून अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
अंत्यदर्शन व पुढील विधींबाबत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

🕊️ भावपूर्ण श्रद्धांजली :
परमहंस तेजस्वी बाबा यांना KattaNews.in परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली.
बाबांच्या आठवणी सदैव भाविकांच्या हृदयात जिवंत राहतील.

📌 तत्काळ अपडेट मिळवा

महाराष्ट्रातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मिनिटाचा अपडेट मिळवण्यासाठी आमचे नोटिफिकेशन ऑन करा.

👉 KattaNews.in ला भेट द्या

🔎 संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment