हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा जिल्ह्यात स्प्रिंकलर तोट्या चोरी प्रकरणी मोठी कारवाई! 8 गुन्ह्यांची उकल, दोघे अटकेत – 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

On: January 25, 2026 4:50 PM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यात स्प्रिंकलर तोट्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा |२५ जानेवारी २०२६

बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या स्प्रिंकलरच्या तांब्याच्या तोट्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून तब्बल 8 चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतमाल व शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक गठित करण्यात आले. मेहकर, लोणार, जानेफळ, डोणगाव व इतर पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या स्प्रिंकलर तोट्या चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करण्यात आला.या प्रकरणातील एक महत्त्वाची तक्रार दि. 3 डिसेंबर 2025 रोजी महादेव किसन मोहरुत (वय 25, रा. धार, ता. मेहकर) यांनी पोलीस स्टेशन जानेफळ येथे दिली होती. त्यांच्या शेतातून 141 नग तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या (किंमत अंदाजे 42,300 रुपये) अज्ञात आरोपींनी चोरीस नेल्याचे नमूद करण्यात आले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दि. 22 जानेवारी 2026 रोजी या गुन्ह्यांची यशस्वी उकल केली. या कारवाईत देवराज युवराज पवार (वय 22)उमेश राजु पवार (वय 25), दोघेही रा. मोहना खुर्द, ता. मेहकर या आरोपींना अटक करण्यात आली.

अटक आरोपींकडून सुमारे 80 हजार रुपयांच्या तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित आरोपी सध्या जानेफळ पोलीस यांच्या ताब्यात आहेत. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढाअमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोनि. सुनिल अंबुलकर, पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, पोकों. निलेश राजपूत, राजेंद्र गडकर, विकास देशमुख तसेच पोलीस स्टेशन जानेफळचे सपोनि अजिनाथ मोरे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.


हे पण वाचा


📢 अधिक स्थानिक व शेतकरी हिताच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा.



 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment