हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक प्रकार! बुलढाण्यात महिला तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; रेती माफियाची दहशत उघड

On: January 23, 2026 7:13 PM
Follow Us:
बुलढाण्यात अवैध रेती वाहतुकीदरम्यान महिला तलाठीवर ट्रॅक्टर हल्ल्याची घटना

बुलढाणा | २३ जानेवारी २०२६

बुलढाणा जिल्ह्यात रेती माफियाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राणही धोक्यात आले आहेत. महिला तलाठीवर ट्रॅक्टर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार, २० जानेवारी रोजी बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे घडला. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालकाने ग्राम महसूल अधिकारी उषा संतोष देशमुख व त्यांच्या सहकारी भाग्यशाली गजेंद्र गिरी यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.

ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. रायपूर येथील तलाठी कार्यालयाजवळ विना नंबरचा निळ्या रंगाचा न्यू हॉलंड ३६०० कंपनीचा ट्रॅक्टर रेतीने भरलेला जात असल्याचे दिसताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संशयावरून ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता थेट महिला तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर नेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

या प्रकरणात ट्रॅक्टर चालकाचे नाव ज्ञानेश्वर मुरडकर (रा. रायपूर) असे असून, महसूल विभागाच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून त्यातील १ ब्रास रेती (किंमत ३ हजार रुपये)ट्रॅक्टर (किंमत अंदाजे ३ लाख रुपये) असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कर्तव्य बजावत असताना महिला अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील, तर महिला सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल महसूल व पटवारी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी रायपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१, ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपी चालकाला अटक न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा..

सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेरच अधिक दिसतात!

पटवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ राजपूत यांनी स्पष्ट इशारा दिला असून, आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तुमचं मत काय? महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणि तातडीची अटक आवश्यक आहे का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

बुलढाणा वन सर्वेक्षक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाच; बुलढाण्यात वन सर्वेक्षकावर गुन्हा दाखल

बेपत्ता महिला शेगाव - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शेगाव: ब्युटी पार्लरमध्ये जाते सांगून घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

Leave a Comment