हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“उबाठा गट आता इतिहासजमा!” – महायुतीचाच महापौर बसणार; भाजप प्रवक्ते विनोद वाघ

Follow Us:
उबाठा गटावर टीका करताना भाजप प्रवक्ते विनोद वाघ

बुलढाणा |२५ जानेवारी २०२६

मुंबई व महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जुने मित्र’ पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी आक्रमक शैलीत पूर्णविराम दिला आहे.

“आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हीच खरी व नैसर्गिक युती असल्याचे स्पष्ट केले.

ही युती केवळ सत्तेसाठी नसून ती हिंदुत्वाच्या विचारावर आधारित असल्याचे सांगत, “खरी बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडेच आहे,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.

उबाठा गटावर टीका करताना वाघ म्हणाले, “जे काही उबाठा गट आहे, तो आता बाजूला फेकला गेला आहे.” केवळ अफवा पसरवून राजकारण करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली असल्याचा दावा त्यांनी केला.

महायुतीने निवडणुकीच्या मैदानात आपली ताकद सिद्ध केली असून, आगामी काळात महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“जुने मित्र म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना! आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि महायुतीचाच महापौर बनवणार.”

— विनोद वाघ, प्रवक्ते, भाजप

हे पण वाचा.

पाटोदा येथे एसटी बसचा कहर; बाहेर निघालेल्या लोखंडी पत्र्यामुळे भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

धक्कादायक प्रकार! बुलढाण्यात महिला तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; रेती माफियाची दहशत उघड


📢 अधिक राजकीय अपडेटसाठी KattaNews.in वाचत रहा

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा राजकारण

श्वेता महाले-संजय गायकवाड वाद पुन्हा पेटला, इंस्टाग्राम व्हिडिओतून थेट चिमटा ‘रावण बनकर आओगे तो…’

शिवदास रिंढे बुलढाणा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस फेरनिवड

शिवदास रिंढे यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा भाजप शिवसेना

‘लहान मुलगा इकडे, बायको तिकडे, मोठा मुलगा तिकडे…’ ‘तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?’ श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर थेट निशाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा बुलढाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा: बुलढाण्यात शिवसेना आमदारावर FIR दाखल, नवा वाद चिघळला

Leave a Comment