हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

आजचे विद्यार्थी हेच उद्याचा भारत घडवणारी पिढी! – माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

On: January 11, 2026 5:23 PM
Follow Us:
शेंदुर्जन संस्कार विद्या मंदिर शाळेच्या स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा | शुक्रवार, ११ जानेवारी २०२६

Sindkhed Raja News – शेंदुर्जन येथील संस्कार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात बोलताना माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की,
आजचे विद्यार्थी हेच उद्याचा भारत घडवणारी पिढी असून त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे.”लहान मुलांचे जग निर्मळ असते. आजच्या डिजिटल युगात मुले तंत्रज्ञानाशी लवकर जोडली जात असली तरी
त्यांना खेळाच्या मैदानात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तकांचे ओझे कमी करून
क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस यांसारख्या खेळांकडे मुलांना वळवले पाहिजे,”
असे प्रतिपादन डॉ. शिंगणे यांनी अध्यक्षस्थानावरून केले.संस्कार विद्या मंदिर शाळेच्या या स्नेहसंमेलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.

यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते
मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये दिनकरराव देशमुख (माजी जिल्हा परिषद सभापती), नितीनदादा शिंगणे,
सुधाकरराव शिंगणे (पं.स. सभापती), खुशालराव शिंगणे, बद्रीभाऊ वाघ,
मदनराव कायंदे (माजी सरपंच), ह.भ.प. दामू अण्णा शिंगणे,
दिलीप नागरे (केंद्रप्रमुख), नंदकिशोर शिंगणे,
सिताराम नागरे (माजी सैनिक), डॉ. सतीश जायभाये (सरपंच जागदरी)
यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिलीप नागरे यांनी केले.
सूत्रसंचालन नागरे व शिंगणे मॅडम यांनी प्रभावीपणे केले.
शाळेच्या नागरे मॅडम, शिंगणे मॅडम, पूजा मॅडम आणि वायाळ मॅडम
यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

हे पण वाचा..

चिखली-खामगाव रोडवर कार उलटली, १७ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू.

शेवटी उपस्थित पाहुणे, पालक व ग्रामस्थांचे आभार केंद्रप्रमुख दिलीप नागरे यांनी मानले
आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

👉 तुमच्या गावातील बातमी Katta News वर प्रसिद्ध करा

तुमच्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय किंवा क्राईम बातमी आम्हाला पाठवा.
WhatsApp : 9561475736

संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment