हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकरमध्ये खळबळ! डोणगाव ग्रामपंचायत प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; आंदोलनाचा मोठा परिणाम

On: January 10, 2026 8:50 AM
Follow Us:
मेहकर पंचायत समितीकडून डोणगाव ग्रामपंचायत प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना दृश्य

मेहकर प्रतिनिधी/कट्टा न्यूज नेटवर्क 

डोणगाव ग्रामपंचायत प्रकरणी मेहकर पंचायत समितीने मोठी प्रशासकीय कारवाई करत संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतीशी संबंधित तक्रारींवर वेळेत कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर अखेर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून, या नोटीसमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

डोणगाव ग्रामपंचायतीतील विविध गंभीर तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश यापूर्वीच पंचायत समितीकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.या दिरंगाईविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. १७ सप्टेंबर रोजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालय, मेहकर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान अमोल धोटे यांनी डोणगाव ग्रामपंचायतीतील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाची गंभीर दखल घेत पंचायत समितीने संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत तक्रारींवरील कार्यवाहीस झालेल्या विलंबाबाबत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून, ठरावीक कालावधीत समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

👉 प्रशासनाच्या या कारवाईवर तुमचे मत काय?

डोणगाव ग्रामपंचायत किंवा आपल्या परिसरातील समस्या आम्हाला पाठवा. Kattanews.in वर तुमचा आवाज प्रसिद्ध होईल.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

Leave a Comment