हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Breaking: प्रशांत आंबी चिखलीत डिटेन; बुलढाण्यात गायकवाडांविरोधात मोठं आंदोलन पेटलं

On: April 28, 2026 5:29 PM
Follow Us:
बुलढाण्यातील आंदोलन, प्रशांत आंबी डिटेन, संजय गायकवाड वाद, शिवाजी महाराज मुद्दा

बुलढाणा | कट्टा न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात सध्या वातावरण प्रचंड तापले असून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कम्युनिस्ट कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संताप उसळला आहे. विशेष म्हणजे, प्रशांत आंबी यांना चिखली येथे पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले (डिटेन) असल्याने आंदोलनाला आणखी धार मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यभरातून आलेले कम्युनिस्ट कार्यकर्ते बुलढाण्यात एकत्र जमले असून “शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही” अशा तीव्र घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सुमारे 150 ते 200 पोलिस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तैनात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांच्या कार्यालयासमोर जमल्याचे दिसत आहे. अंदाजे 3 ते 4 हजार समर्थक उपस्थित असल्यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.

“गायकवाडांवर अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?” असा सवाल उपस्थित करत कम्युनिस्ट पक्षाने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काळात हे आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी तणाव कायम असल्याने पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पुस्तक वाचन कार्यक्रम पार पडतो का आणि आंदोलनाची दिशा काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


📢 तुमचं मत काय?

गायकवाड प्रकरणावर तुमचं मत काय आहे? खाली कमेंट करून नक्की कळवा आणि ही बातमी शेअर करा.


🔗 Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment