सिंदखेडराजा,प्रतिनिधी/रामदास कहाळे
आज कोणाला मिळाले कोणते निवडणूक चिन्ह?
नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांपैकी दिलीप भिकाजी चौधरी यांना ‘पाना’ तर
सय्यद मोबीन सय्यद नईम यांना ‘हिरा’ हे स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्यात आले.
पक्षाकडून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित पक्षांचे अधिकृत चिन्ह देण्यात आले.
ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, सहाय्यक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे, तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार नितीन बढे आणि प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आज दुपारी 12 वाजता सर्व उमेदवारांना निवडणूक निशाणी, निवडणूक नियम, आचारसंहिता
आणि त्यांना पडणाऱ्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. संजय खडसे यांनी प्रचारादरम्यान कोणते नियम पाळावे याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
📌 अधिक अपडेट्स लगेच मिळवा!
▶ सिंधखेडराजा नगर परिषद निवडणूक 2025 संबंधित सर्व ताज्या अपडेट्स, निकाल, प्रचार आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे Kattanews.in नियमितपणे भेट द्या.
🔗 Related News










