हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

स्व.किसनराव सदार विद्यालयात कृतज्ञ दिन उत्साहात साजरा

On: February 4, 2026 7:16 AM
Follow Us:
खडकी सदार येथील स्व किसनराव सदार विद्यालयात कृतज्ञ दिन साजरा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

खडकी सदार | ४ जानेवारी २०२६

येथील स्व. किसनराव सदार विद्यालयामध्ये दिनांक ३१ जानेवारी रोजी कृतज्ञ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जाधव सर (मुख्याध्यापक) उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सतीश वायाळ सर, प्रमोद बकाल सर, प्रदीप वाठोरे सर, श्रीराम फुपाटे सर, खडसे सर, मंगेश कोरडे, माधव मार्कड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेचे महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निसर्गाने आपल्याला मानव शरीर दिले आहे, याबद्दल आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, “माणूस शरीराने विकलांग असला तरी मनाने मजबूत असणे गरजेचे आहे. आज अनेक तरुण अपयशामुळे आत्महत्येचा मार्ग निवडतात; मात्र आत्महत्या हा उपाय नाही. आलेल्या संकटांना सामोरे जाऊन चांगल्या दिवसांची वाट पाहणे हेच खरे जीवन आहे. जीवन सुंदर आहे, ते जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “जगात काहीही अशक्य नाही. फक्त मनाची आणि कष्ट करण्याची तयारी हवी. मेहनत ही जीवनाची शिदोरी आहे. प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते.”

अशा प्रेरणादायी वातावरणात स्व. किसनराव सदार विद्यालयात कृतज्ञ दिन साजरा करण्यात आला.


📌 संबंधित बातम्या

👉 अशाच स्थानिक व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

ज्ञानेश्वर सदार

ज्ञानेश्वर सदार हे Kattanews.in चे अनुभवी पत्रकार असून गुन्हेगारी, न्यायालयीन व आर्थिक विषयांवरील विश्वासार्ह आणि तथ्याधारित बातम्यांसाठी ओळखले जातात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026 दरम्यान रेशन कार्ड व वारस नोंदींचे वितरण

गोरेगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026’ उत्साहात; रेशन कार्ड ते वारस नोंदींचे थेट वितरण

khaparkheda-illegal-sand-mining-lonar-buldhana-maharashtra

खापरखेड रेती घाटावर नियमांना तिलांजली! पोकलॅंडच्या साह्याने अवैध उत्खनन; महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय

रिसोड तालुक्यात वाशिम महसूल कर्मचारी संघटनेची बिनविरोध कार्यकारिणी निवड सभा

महसूल कर्मचाऱ्यांची एकजूट! रिसोड तालुका कार्यकारिणी बिनविरोध निवडली, शारदा इंगळे अध्यक्ष

चिखली-बुलढाणा रोड अपघात हातणी जवळ ट्रकखाली चिरडून युवकाचा मृत्यू

चिखली-बुलढाणा रोडवर भीषण अपघात! परीक्षेला निघालेल्या 23 वर्षीय युवकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

रिसोड येथे राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार स्वीकारताना प्रमोद वाबळे गुरुजी

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या प्रमोद वाबळे गुरुजींना राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार; रिसोडचा अभिमान वाढला

आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीवर मोठी मागणी; कार्यरत सरपंचांनाच संधी द्या – आ. श्वेताताई महाले पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Comment