KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

किन्होळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; दलित समाज संतप्त

On: February 3, 2026 1:57 PM
Follow Us:
चिखली तालुक्यातील किन्होळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

चिखली | प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील मौजे किन्होळा (जिल्हा बुलढाणा) येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा गंभीर प्रकार
दिनांक ३० जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री घडल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सम्यक बुद्ध विहारासमोरील विद्युत मीटर उध्वस्त करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
अंधाराचा फायदा घेत काही तरुणांनी विहारातील महापुरुषांच्या प्रतिमांची
विटंबना करण्याच्या उद्देशाने हालचाल केल्याचे बौद्ध समाज बांधवांचे म्हणणे आहे.

यावेळी जागरूक नागरिकांनी त्यांना पाहून पकडण्याचा प्रयत्न केला असता
संशयित तरुण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

घटनेची माहिती देण्यासाठी बौद्ध समाज बांधव त्याच रात्री
पोलीस स्टेशन चिखली येथे दाखल झाले होते.
मात्र सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारी २०२६ रोजी
दलित समाज बांधवांनी पोलीस ठाण्यावर घेराव घातला.
यानंतर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून
उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलीस प्रशासनाने फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर
परिस्थिती शांत करण्यात आली.

दरम्यान, फरार आरोपींपैकी एक आरोपी हा
चिखली मतदारसंघातील सत्ताधारी आमदारांचा नातेवाईक असल्याचा
आरोप करण्यात येत असून,
या प्रकरणात राजकीय दबाव टाकून गुन्हा दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा
दावा दलित समाजाकडून करण्यात येत आहे.

“तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याने हा प्रकार
दलित समाजावर अन्याय करणारा आहे,”
अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मुख्य आरोपीस तात्काळ अटक करून
कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,
अशी ठाम मागणी दलित समाज संघटनांकडून करण्यात येत आहे.


📌 दलित समाजाच्या प्रमुख मागण्या

  • फरार आरोपींची तात्काळ अटक
  • अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा
  • राजकीय दबावमुक्त चौकशी
  • सम्यक बुद्ध विहार परिसरात पोलीस बंदोबस्त

🔴 संबंधित बातम्या


👉 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा – Kattanews.in

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन

सक्तीची कर्जवसुली थांबवा, स्मार्ट मीटर हटवा! मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला अल्टिमेटम

देऊळगाव राजा पोलीस आणि तेलंगणा LCB प्रकरण

मामाच्या तक्रारीवरून अपहरणाची नोंद करण्याची देऊळगाव राजा पोलिसांना घाई का? तेलंगणा LCB प्रकरणात सवाल

जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले नऊ टिप्पर

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त

इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याने साखरखेर्डा येथील संसार मोडल्याची घटना

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

नेवासा सोयाबीन चोरी प्रकरणात देऊळगाव राजा येथील तिघांना अटक

नेवासा सोयाबीन चोरीचा तपास थेट देऊळगाव राजात; पाच जणांची नावे समोर, तिघांना अटक, दोघे फरार

देऊळगाव राजा येथे तेलंगणा पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतल्याची घटना

देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!

Leave a comment