KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

पंधराव्या वित्त आयोगाच्या १२ लाखांवर डल्ला; ग्रामसेवक गणेश पायघन निलंबित

On: February 4, 2026 12:20 PM
Follow Us:
कोलवड ग्रामपंचायतीतील पंधराव्या वित्त आयोगाचा १२ लाखांचा निधी अपहार प्रकरण

बुलढाणा | ४ फेब्रुवारी २०२६

KattaNews जाहिरात 1

बुलढाणा  शहराजवळील कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर तब्बल १२ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) गणेश पायघन यांनी हा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.

KattaNews जाहिरात 2

 

KattaNews जाहिरात 3

कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अपहार प्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई

KattaNews जाहिरात 4

कोलवड ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या गणेश पायघन यांच्याविरोधात विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली. समितीने केलेल्या कसून चौकशीत पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचा दुरुपयोग व अपव्यय झाल्याचे स्पष्ट झाले.

बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी दप्तर तपासणी केली असता एकामागून एक आर्थिक गैरप्रकार उघड झाले. गणेश पायघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ६ जानेवारी २०२६ व २२ जानेवारी २०२६ रोजी खुलासे मागविण्यात आले होते.

मात्र, दिलेल्या खुलाशांमध्येही ते आपला भ्रष्टाचार लपवू शकले नाहीत. चौकशीमध्ये दोषी आढळल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील कलम ३ चा भंग केल्याचे स्पष्ट झाले.

चौकशी अहवालानुसार, पंधराव्या वित्त आयोगातून खर्च केलेली रक्कम प्रथम संबंधित पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर त्याच वेंडरच्या खात्यातून तब्बल ११ लाख ५५ हजार रुपये स्वतःच्या व नातेवाइकांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे बँक स्टेटमेंटवरून सिद्ध झाले.

ज्या कामांसाठी देयके अदा करण्यात आली, त्या कामांची नोंद नमुना क्रमांक ५ मध्ये आढळली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामे न करता बोगस बिले तयार करून निधीचा अपहार केल्याची गंभीर बाबही चौकशीत समोर आली.

गणेश पायघन यांच्याकडे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या रायपूर ग्रामपंचायतीचाही प्रभार होता. त्यांच्या तेथील कारकिर्दीतही भ्रष्टाचाराचे आरोप झाले असल्याची माहिती समोर आली असून सदर कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


👉 ग्रामपंचायत भ्रष्टाचार, जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आणि मोठ्या ब्रेकिंग न्यूजसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पेनटाकळी धरणाच्या पाणीवाटपावरून प्रतापराव जाधव, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, संजय रायमुलकर आणि रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय भूमिकांचे विश्लेषण

पाणी मिळाले, पण राजकीय पोळी भाजली कुणाची?पेनटाकळीच्या संघर्षाचा राजकीय पंचनामा!

धाड बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा तपास करणारे धाड पोलीस

धाड बसस्थानकात महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी; एका तासात 4 महिला आरोपींचा शोध, 94 हजारांच्या चोरीचा उलगडा

देऊळगाव राजा येथे मोकाट जनावरांच्या समस्येचे प्रतीकात्मक छायाचित्र

वनरक्षक होण्याचे स्वप्न अधुरेच! देऊळगाव राजात मोकाट गायीच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

बुलढाण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री चोरीचा प्रयत्न करणारे चड्डी गँगचे चार संशयित CCTV फुटेजमध्ये कैद

बुलढाण्यात रात्री २ वाजता चड्डी गँगचा धुमाकूळ! भिंतीला छिद्र पाडून घरात शिरण्याचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोन घरांना टार्गेट, चौघे CCTV मध्ये कैद

पेनटाकळी धरणाच्या पाणीप्रश्नावर सिद्धार्थ खरात, प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर आणि श्वेता महाले यांच्या भूमिका दर्शवणारे राजकीय विश्लेषण

पेनटाकळीच्या पाण्यात राजकारणाचे प्रतिबिंब! कुणी जनतेचा कैवारी ठरला, तर कुणी श्रेयाच्या स्पर्धेत उतरला ?

मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बस अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बसच्या धडकेत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Leave a comment