हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील स्टेट बँक फोडण्याचा धाडसी प्रयत्न! रात्री २ वाजता दोन चोरटे CCTV मध्ये कैद

On: November 26, 2025 8:10 AM
Follow Us:
मेहकर नायगाव दत्तापूर स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटे CCTV मध्ये कैद
मेहकर प्रतिनिधी/सुनील वरखेडे 
नायगाव दत्तापूर येथील स्टेट बँक फोडण्याचा प्रकार हा मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर परिसरात मोठा खळबळ उडवणारा विषय ठरला आहे. २२ नोव्हेंबर रोजी पहाटे रात्री २ वाजता दोन अज्ञात चोरट्यांनी नायगाव दत्तापूर येथील स्टेट बँकेची खिडकी फोडून आत प्रवेश केला. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून
या नायगाव दत्तापूर स्टेट बँक फोडण्याच्या या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.सविस्तर असे की नायगाव दत्तापूर येथील स्टेट बँक शाखेच्या मागील बाजूची खिडकी फोडून चोरट्यांनी रात्री बँकेत प्रवेश केला. मात्र त्यांचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला.बँकेतील रोख रक्कम, लॉकरमधील दागिने आणि महत्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक सोनल विजय खैरे यांनी दिली.

सिक्युरिटी अलार्म आणि CCTV सिस्टम डॅमेज

चोरट्यांनी सुरक्षेत असलेला अलार्म सिस्टम डॅमेज केला होता तसेच कॅश काउंटर मागील कॅमेरा तोडून टाकला होता.सुदैवाने इतर कॅमेऱ्यातील फुटेज सुरक्षित राहिल्याने दोन्ही चोरटे स्पष्ट दिसून आले.

फिर्यादीवरून अप. क्र. ४०६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोहन सावंत आणि टीम करीत आहे.

घटनेनंतर बुलडाणा येथील श्वानपथक, ठसेतज्ञ आणि न्यायवैद्यकीय तज्ञांनी घटनास्थळी तपास केला. तथापि, घटनेच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.


🔍 Related News


👉 आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

🔥 ताज्या अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक बातम्यांसाठी आमचा WhatsApp ग्रुप ताबडतोब जॉईन करा!

WhatsApp जॉईन करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment