सिंदखेडराजा | ४ फेब्रुवारी २०२६
सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.सिंदखेडराजा तालुक्यातील ८१ पैकी ४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ
९ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत असून,
१० फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज लागू होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका आरक्षणाच्या प्रक्रियेत अडकल्यामुळे
ग्रामीण भागात निवडणुकीऐवजी प्रशासकीय व्यवस्थेचा पर्याय लागू केला जात आहे.
बुलढाणा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका अद्याप जाहीर न झाल्याने
गावागावात संभ्रमाचे वातावरण आहे.
जोपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत नाहीत,
तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
या ४३ ग्रामपंचायतींमध्ये साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड आणि किनगावराजा
या तालुक्यातील मोठ्या व लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
मागील काही काळात अनेक ग्रामपंचायतींनी विकास कामांचा वेग वाढवला होता.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेली तसेच मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली
अनेक कामे प्रशासक राज लागू झाल्याने रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे निधी वितरण आणि प्रशासकीय स्वाक्षऱ्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने
अनेक गावांतील सुरू असलेल्या विकास कामांना तात्पुरता ब्रेक लागला आहे.
यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा दबावाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
९ फेब्रुवारी रोजी कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायती
राजेगाव, गोरेगाव, दुसरबीड, वसंतनगर, सुलजगाव, विझोरा, सायाळा, भोसा, पळसखेड चक्का,
तांदुळवाडी, वडाळी, कुंबेफळ, जागदरी, खामगाव, दत्तापुर, देऊळगाव कोळ, पिंपळखुटा,
आंबेवाडी, हनवतखेड (मलकापूर पांग्रा), कोणाटी, हनवतखेड (महा), वाघोरा, डावरगाव,
भंडारी, हिवरा गडलिंग, जळगाव, डोरव्ही, उमनगाव, कंडारी, साखरखेर्डा, चिंचोली,
गारखेड, पिंपळगाव लेंडी, सोनोशी, राहेरी बु., नाईकनगर, शेंदुर्जन, किनगाव राजा,
मलकापूर पांग्रा, पिंपरखेड बु., लिंगा, पोफळ शिवनी.
📢 आपल्याला काय वाटतं?
प्रशासक राजामुळे गावाचा विकास रखडेल की प्रशासन अधिक प्रभावी ठरेल?
आपलं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि बातमी शेअर करा.
🔗 संबंधित बातम्या
📌 ग्रामीण, राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांसाठी Kattanews.in ला फॉलो करा














