हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

On: August 25, 2026 7:25 AM
Follow Us:
देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम
देऊळगाव राजा (प्रतिनिधी) : मनोहर खंदारे 

देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध शाखा, विभाग, शैक्षणिक सुविधा तसेच उपलब्ध उपक्रमांची माहिती देत त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव आणि व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात विशिष्ट ध्येय निश्चित करून सातत्य, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.

दीक्षारंभ कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संबंधित शाखा आणि उपक्रमांची माहिती दिली. कला शाखेविषयी प्रा. डॉ. अनंत आवटी, वाणिज्य शाखेविषयी प्रा. डॉ. विनोद बन्सीले आणि विज्ञान शाखेविषयी प्रा. डॉ. अरविंद कानवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ग्रंथालयाविषयी प्रा. डॉ. उमेश देशमुख, आयक्युएसीविषयी प्रा. डॉ. एकनाथ भालेराव, राष्ट्रीय सेवा योजनेविषयी प्रा. डॉ. रामेश्वर माने आणि राष्ट्रीय छात्र सेनेविषयी प्रा. डॉ. महेश तांदळे यांनी माहिती दिली.

तसेच महाविद्यालयातील क्रीडा विभागाविषयी प्रा. डॉ. किरण मोगरकर, विद्यार्थी करिअर कट्ट्याविषयी प्रा. ज्ञानेश्वर शिंब्रे आणि अंतर्गत तक्रार निवारण समितीविषयी प्रा. डॉ. ज्योती ढोकले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील क्रीडा विभाग, ग्रंथालय तसेच विज्ञान विभागातील विविध प्रयोगशाळांची प्रत्यक्ष पाहणी करून देण्यात आली. त्यामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक आणि इतर सुविधांची जवळून माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय विद्यार्थी दीक्षारंभ समितीचे प्रमुख प्रा. डॉ. गजानन तांबडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीक्षापुत्र बिऱ्हाडे आणि प्रा. डॉ. रवींद्र गणबास यांनी केले. आभार प्रा. गोविंद ढगे यांनी मानले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📲 ताज्या स्थानिक बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

देऊळगाव राजा, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.


👉 Join WhatsApp Group

📰 Related News

बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

एक टायर फुटला अन् क्षणात सगळं संपलं! समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,९ गंभीर

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा एल्गार; २७ ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून लिलावाचा इशारा

📢 KattaNews सोबत जोडलेले रहा

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या स्थानिक, शैक्षणिक आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews ला नियमित भेट द्या.

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100 घेतल्याची तक्रार

चिखलीत रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100? तहसील कार्यालयातील तक्रारीने खळबळ; चौकशीची मागणी

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील SIR मतदार पडताळणी अभियान

Sindkhed Raja News: 3 लाख 11 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण; मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांचा आकडा समोर

चिखली तहसील कार्यालयासमोर निकृष्ट रेशनचा तांदूळ ओतताना नागरिक

“या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका-पोरांसोबत खावी!” चिखलीत संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ओतला रेशनचा तांदूळ

साखरखेर्डा येथे कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करा; साखरखेर्डा येथे पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Buldhana News जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय

Buldhana News: बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

Buldhana News समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Buldhana News: एक टायर फुटला अन् क्षणात सगळं संपलं! समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,९ गंभीर

Leave a Comment