हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा

On: October 8, 2026 4:12 PM
Follow Us:
नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश

डोणगाव | माधव भांदुर्गे

पिण्याच्या पाण्याचा भविष्यातील प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने नेतनसा ल.पा. प्रकल्पातून शेती आणि सिंचनासाठी होणाऱ्या पाणी उपशावर कडक भूमिका घेतली आहे. शेतीसाठी सुरू असलेला पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशानंतरही अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू ठेवल्यास पंप, विद्युत मोटारी, पाइपलाइन आणि इतर साहित्य जप्त करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यंदा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने ही कार्यवाही सुरू केली आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी जलसाठ्याचा वापर काटेकोरपणे करण्यावर विभागाचा भर आहे.

रिसोड येथील पाटबंधारे शाखेने नेतनसा ल.पा. योजनेतून शेती व सिंचनासाठी होणारा पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पाटबंधारे शाखा, रिसोडचे सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) कु. पु. अ. श्रीवास यांनी मादणी (ता. मेहकर) ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना या आदेशाची माहिती तातडीने देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी गावात दवंडी अथवा इतर प्रभावी माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.

नदी, नाले, कालवे आणि जलाशयांमधून शेती अथवा सिंचनासाठी पाण्याचा उपसा करण्यास बंदी असल्याचे शेतकऱ्यांना स्पष्टपणे कळविण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सध्या शेतीसाठी पाणी उपसा सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी तो स्वतःहून आणि तात्काळ बंद करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सूचना देऊनही पाणी उपसा सुरू राहिल्यास कारवाई

पाटबंधारे विभागाने दिलेल्या सूचनेनंतरही कोणी अनधिकृत किंवा बेकायदेशीरपणे पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर पाणी उपशासाठी वापरण्यात येणारे पंप, विद्युत मोटारी, पाइपलाइन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसाठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग आणि जलसंपदा विभागाने योग्य समन्वय ठेवून संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशाची प्रत वाशीम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, रिसोड व मेहकरचे तहसीलदार तसेच रिसोड आणि मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

📲 KattaNews WhatsApp ग्रुप जॉईन करा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट्स आणि महत्त्वाच्या स्थानिक घडामोडी थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.


👉 WhatsApp Group Join करण्यासाठी Click करा

📢 तुमच्या गावातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!

पाणीटंचाई, शेती, प्रशासन, रस्ते, शिक्षण किंवा नागरिकांच्या समस्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती असल्यास KattaNews पर्यंत पाठवा. योग्य पडताळणीनंतर तुमच्या परिसरातील बातमी प्रसिद्ध केली जाऊ शकते.

पाणी हा केवळ शेतीचा नाही, तर प्रत्येक गावाच्या भविष्यातील जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर करणे आणि संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

अंत्री खेडेकर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतात पाणी काढताना बिबट्याचा शेतमजुरावर अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पळसखेड चक्का येथे झालेला भीषण अपघात

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर भीषण अपघात; पुलावरून मोटरसायकल खाली कोसळली, चालकाचा जागीच मृत्यू

Leave a comment