KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

Buldhana News: बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

On: August 24, 2026 5:28 PM
Follow Us:
Buldhana News जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय
बुलढाणा|समाधान सरकटे  

KattaNews जाहिरात 1

Buldhana News : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून सहकार पॅनलने निवडणूक झालेल्या ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. दुसरीकडे परिवर्तन पॅनलने दोन जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती नोंदवली आहे. या निकालामुळे जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

KattaNews जाहिरात 2

जिल्हा बँक निवडणुकीकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणुकीपूर्वी विविध राजकीय गट आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांनी आपापल्या पॅनलसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे सात जागांचे निकाल कोणाच्या बाजूने लागतात, याची उत्सुकता होती.

KattaNews जाहिरात 3

अखेर निकाल समोर आल्यानंतर सहकार पॅनलने आघाडी घेतली. सातपैकी पाच जागा सहकार पॅनलच्या खात्यात गेल्या, तर परिवर्तन पॅनलला दोन जागा मिळाल्या. या विजयामुळे सहकार पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

KattaNews जाहिरात 4

या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाची विशेष चर्चा होत आहे. विविध गट आणि नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा फायदा सहकार पॅनलला झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे या निकालानंतर डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.

सहकार पॅनलच्या विजयात अनेक महत्त्वाच्या लढतींचा समावेश आहे. अनुसूचित जाती मतदारसंघातून डॉ. संजय रायमुलकर यांनी विजय मिळवला. संग्रामपूर मतदारसंघात श्रीकांत मारोडे यांनी अटीतटीच्या लढतीत चार मतांनी विजय मिळवला. तर लोणार मतदारसंघातून संतोष मापारी यांनी विजय मिळवला.

दुसरीकडे, परिवर्तन पॅनलनेही दोन जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. नागरी बँका-पतसंस्था मतदारसंघातून ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी बाजी मारली, तर शिवचंद्र तायडे यांच्या विजयामुळे परिवर्तन पॅनलला आणखी एक महत्त्वाची जागा मिळाली.

या निकालानंतर जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, २१ सदस्यीय संचालक मंडळात सहकार पॅनलचे संख्याबळ १९ वर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कारभारात सहकार पॅनलची पकड आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, निवडणुकीतील या निकालामुळे आगामी काळात सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे लक्ष लागले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने मिळवलेले हे यश पुढील काळातील निर्णयांमध्ये किती निर्णायक ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

🟢 बुलढाण्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा!

बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि ताजे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


👉 Join WhatsApp Group

📰 Related News

👉 Buldhana News: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी 94% मतदान; आज निकाल, कोण बाजी मारणार ? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

👉 शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा एल्गार; २७ ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून लिलावाचा इशारा

👉 Buldhana News: एक टायर फुटला अन् क्षणात सगळं संपलं! समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,९ गंभीर

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

खडकपूर्णा प्रकल्पातील शेतीच्या मोटारी बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करणारे शेतकरी

आधी अवैध रेती उपसा बंद करा, मगच मोटारी बंद करा! खडकपूर्णा प्रकल्पावर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

अमडापूर शिवारात गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात तीन जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई

अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक

घाटबोरी येथे चोरीला गेलेले सोयाबीनचे कट्टे

घाटबोरीत शेतकऱ्याला मोठा फटका! गोडाउनबाहेरचे १६ कट्टे सोयाबीन चोरीला

साखरखेर्डा येथील गायखेडी तलावातून अवैध पाणी उपशावर कारवाई करताना महसूल अधिकारी

साखरखेर्ड्यात महसूल विभागाची धडक कारवाई; गायखेडी तलावातून पाणी उपसा करणारे १० मोटारपंप जप्त

चिखली नगरपरिषदेच्या प्रस्तावित बॉम्बे मार्केट BOT प्रकल्पाशी संबंधित बाजारपेठ

पाच मिनिटांत २१ विषय मंजूर? चिखली नगरपरिषदेच्या सभेवर विरोधकांचे गंभीर आक्षेप

साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठ्याचा प्रश्न

साखरखेर्डा परिसरात पाझर तलावांचा पाणीसाठा धोक्यात! वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, उपसा मात्र सुरूच

Leave a comment