हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
वाशिम जिल्ह्यातील जांब (अढाव) गावात मोबाईल नेसामान्य शेतकरी ते जनतेचा आवाज! नागेशभाऊ गंगादाभा ग्रामसेवकाला २० हजारांची लाच स्वीकारतासंजय गायकवाडांविरुद्ध कामासाठी ‘एक कोटी’ दिबुलढाणा जिल्हा हादरला! अंढेर्यात चौथा खून — यबुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्य

शिवसेनेचे युवा नेते डॉ. किशोर उढाण रांजणी जिल्हा परिषदेतून उतरतात रणांगणात; जनतेतून उमेदवारीची जोरदार मागणी!

On: October 31, 2025 7:46 AM
Follow Us:

हनुमंत दवंडे /परतुर

रांजणी : शिवसेनेचे लोकप्रिय आणि कार्यक्षम युवा नेते डॉ. किशोर उढाण हे रांजणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. जनतेतून त्यांच्या उमेदवारीची प्रचंड मागणी होत असून, रांजणी सर्कलमध्ये नवा बदल घडवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील डॉ. किशोर उढाण हे शिवसेनेचे युवा आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेले कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्य, आरोग्य सेवा आणि ग्रामीण भागातील विकासकामांमुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

मा. आमदार डॉ. हिकमतदादा उढाण यांचे निकटवर्तीय असलेले किशोर उढाण हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानामुळे रांजणी आणि परिसरात त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

हे पण वाचा.

PM Kisan Yojana 21वा हप्ता : शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये? असा करा Status Check Online

जिरडगाव येथे सरकारी दवाखान्यासाठी स्वतःची जमीन देऊन आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेतल्याने जनतेत त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास वाढला आहे. धवल क्रांती, रिसर्च फाउंडेशन, स्वराज स्किल डेव्हलपमेंट, सिल्क बेरी अॅग्रीकल्चर मॉल यांसारख्या संस्थांद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

रांजणी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीबाबत जनतेतून प्रचंड उत्सुकता दिसत आहे. “लोकांच्या कामाचा माणूस” अशी ओळख असलेले डॉ. किशोर उढाण हे पारदर्शक कार्यपद्धती आणि लोकाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जातात.

शिवसेनेच्या अंतर्गत चर्चांनुसार, डॉ. किशोर उढाण यांच्या उमेदवारीवर पक्षश्रेष्ठींकडून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रांजणी सर्कलला युवा आणि ऊर्जावान नेतृत्व मिळावे, अशी जनतेची अपेक्षा असून, डॉ. उढाण हे त्यासाठी योग्य चेहरा मानले जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!