साखरखेर्डा | १६ जानेवारी २०२६
गेल्या एक महिन्यापासून शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सातत्याने वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदी परिसरात बिबट्याचा वावर यामुळे शेतकरी व ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील दोन दिवसांत परिसरात बिबट्याच्या वावर अधिक तीव्र होत दोन कुत्र्यांची शिकार करण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
याच कालावधीत शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या सलीम तांबोळी यांच्या मुलालाही बिबट्याचे दर्शन झाले. तसेच शिंदी, राताळी, पिंपळगाव सोनारा, दरेगाव आणि मेरा बु परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
सध्या कापूस वेचणी व तूर सोंगणीचा हंगाम सुरू असतानाही बिबट्याच्या भीतीमुळे मजूर कामावर जाणे टाळत आहेत. याचा थेट परिणाम शेती कामांवर होत आहे.
या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तातडीने पंचनामा करून चौकशी करावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
👉 हे पण वाचा..
🟢 हे आवश्यक करा
अशाच स्थानिक, थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.















