हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

lonar lake:लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श

On: January 8, 2026 12:01 PM
Follow Us:
Lonar Lake water level touching Kamalja Devi temple mask in Buldhana Maharashtra

लोणार प्रतिनिधी/विनायक कुटे

lonar lake : लोणार सरोवरातील जलपातळी दिवसेंदिवस वाढत चालली असून ही वाढ आता गंभीर इशारा देत आहे. लोणार सरोवरातील जलपातळी इतकी वाढली आहे की थेट कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श झाला आहे. लोणार सरोवरातील (lonar lake) जलपातळी अशीच वाढत राहिल्यास येत्या एक ते दोन महिन्यांत कमळजा मातेचे मंदिर पूर्णतः पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१५ डिसेंबर रोजी घेतलेल्या पाहणीनुसार कमळजा मातेचे मंदिर बाहेरील बाजूने सुमारे पाच ते सहा फूट पाण्याखाली गेले होते. मंदिराच्या गाभाऱ्यातही तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत पुन्हा सुमारे एक फूट पाणी वाढल्याने कमळजा मातेच्या मुखवट्यालाच जलाभिषेक झाल्याचे दृश्य दिसून आले आहे. लोणार सरोवरातील जलपातळी ही भाविकांसह प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरत आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या जलवाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरोवराच्या काठावर असलेल्या विराज धारतीर्थ येथील गोमुखातून अखंड पाण्याची धार सरोवरात कोसळत आहे. तसेच रामगया, सीतान्हानी आणि पापहेरश्वर कुंड परिसरातील झरे मोठ्या प्रवाहाने वाहत असून ते थेट सरोवरात मिळत आहेत. त्यामुळे लोणार सरोवरातील (lonar lake) जलपातळी झपाट्याने वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा..

सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! बुलडाण्यातील १३ पतसंस्थांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर; सभासदांच्या ठेवींवर काय परिणाम होणार?

कमळजा मातेचे मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा मानले जाते. या मंदिराला पाण्याखाली जाण्यापासून वाचवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविक, पर्यटक आणि लोणार शहरवासीयांकडून जोर धरू लागली आहे. वेळीच दखल न घेतल्यास अपूरणीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


भाविकांची मागणी

✔ वाढती जलपातळी रोखण्यासाठी तातडीचे वैज्ञानिक उपाय
✔ कमळजा मातेच्या मंदिराचे संरक्षण
✔ सरोवरातील झऱ्यांचे शास्त्रीय सर्वेक्षण


👉 तुमच्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला फॉलो करा.
👉 बातमी आवडल्यास शेअर करा.

हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment