हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा: PCR मध्ये वाढ न करण्यासाठी ₹5 हजारांची लाच घेताना बीबी पोलीस ठाण्याचा हेडकॉन्स्टेबल रंगेहात जेरबंद

On: July 29, 2026 7:34 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ACBने बीबी पोलीस ठाण्याच्या हेडकॉन्स्टेबलला PCR मध्ये वाढ न करण्यासाठी ₹5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

लोणार | विनायक कुटे 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACB) मोठी कारवाई करत बीबी पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबलला ₹5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल गुन्ह्यात PCR मध्ये वाढ न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. पडताळणीनंतर ACB ने सापळा रचला आणि आरोपी हेडकॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

📲 ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी
आमच्या WhatsApp Group मध्ये आजच सहभागी व्हा!

👉 WhatsApp Group Join करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा घटकाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध दाखल प्रकरणात घेतलेल्या पोलिस कोठडी रिमांड (PCR) मध्ये वाढ न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात बिट जमादार तथा पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नागरे यांनी सुरुवातीला ₹6 ते ₹7 हजारांची लाच मागितल्याची माहिती समोर आली.

तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 28 जुलै रोजी मागणी पडताळणीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपीने तडजोडीअंती ₹5 हजार स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसथांबा परिसरात सापळा रचण्यात आला.

सापळ्यादरम्यान तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ₹5 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नागरे (वय 40) यांना ACB च्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपी हे बीबी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांचे मूळ गाव जऊळका, तालुका सिंदखेडराजा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.


📌 संबंधित बातम्या

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा दुष्काळ बाबत डॉ शशिकांत खेडेकर यांचे प्रशासनाला निवेदन

पावसाने पाठ फिरवली, सिंदखेडराजा तालुक्यातील खरीप पिके संकटात; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रशासनाला थेट भेट

चिखलीतील उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात आनंदराज आंबेडकर

चिखलीत उपवर्गीकरणाविरोधात हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा; आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘५९ जातींची एकजूट कायम ठेवा’

मोताळा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार संजुभाऊ गायकवाड यांची पाहणी

मोताळ्यात दुष्काळाचे सावट: आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे मनसेचे निवेदन

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचा तहसीलदारांना इशारा

बुलढाण्यातील पळसखेड चक्का येथील मुंढे परिवारातील दोन चुलते-पुतण्यांच्या निधनाची बातमी

एकाच परिवारातील दोन आधारवड हरपले; देशसेवेतील सुभेदार पुत्र वडिलांच्या अखेरच्या निरोपापासून दूर

बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक - अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अविरोध निवड

बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक: ‘किंग इज बॅक’ म्हणत डॉ. राजेंद्र शिंगणे अध्यक्षपदी अविरोध, १८ वर्षांची प्रशासकीय राजवट संपली

Leave a Comment