हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

On: December 12, 2025 3:24 PM
Follow Us:
तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

सचिन खंदारे/प्रतिनिधी

साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरात रातोरात मोठी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरातील नगदी आणि दागिन्यांसह एकूण ६ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
अंकुश शालीग्राम आकाळ हे साखरखेर्डा सेंट्रल बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत असून ४ ते ५ डिसेंबर दरम्यान ते कुटुंबासह भोरसा भोरसी येथे चुलत बहिणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या दरम्यानच चोरट्यांनी त्यांच्या तांदुळवाडी येथील घरावर डोळा ठेवत घराचा कडीकोंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. 

५ डिसेंबर रोजी किराणा खरेदीसाठी साखरखेर्डा येथे आले असता आकाळ कुटुंबास पैसे कमी पडले आणि ते थेट घरी गेले. घरी पोहोचताच त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. पेटी तपासली असता अंदाजे ४० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

हे पण वाचा..

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

ही माहिती त्यांनी फोनवरून आकाळ यांना दिली. नंतर आकाळ कुटुंबीयांसह तांदुळवाडीला पोहोचले व घरातील आतील खोली तपासली असता लोखंडी पेटीत ठेवलेले चांदीचे दागिने, महिलांचे सौभाग्यवती पोथ, लहान मुलांचे दागिने तसेच आणखी रोख रक्कम अशा मिळून ६ लाख १३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

📢 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in ला फॉलो करा!

स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि पोलिस अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या पोर्टलला नियमित भेट द्या.

👉 KattaNews.in — ताज्या बातम्या

📌 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

Leave a Comment