हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
धक्कादायक! काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Reel बनविताना भीषण अपघात! युवकाचा रेल्वेखाली कटCTET February 2026: शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी आनंमतमोजणी धक्कादायकरीत्या पुढे ढकलली; आता 21 डिसजिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत! आयोगाच्यभावी उमेदवार डॉ. ओंकार राठोड यांचा जनसंपर्क द

साखरखेर्डा रोडवर भीषण अपघात! दोन दुचाकी समोरासमोर धडक—1 ठार, एक गंभीर

On: November 21, 2025 7:42 AM
Follow Us:
साखरखेर्डा रोडवरील भीषण दुचाकी अपघातात एक ठार आणि एक गंभीर जखमी

साखरखेर्डा/प्रतिनिधी 

साखरखेर्डा परिसरात आज दुपारी भीषण घटना घडली असून या साखरखेर्डा भीषण अपघात प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे. लव्हाळा ते साखरखेर्डा रोडवर दोन बाइक समोरासमोर धडकल्याने एक तरुणाचा मृत्यू झाला आहे.

या साखरखेर्डा भीषण अपघात प्रकरणात दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मोहाडी फाट्याजवळ घडलेला हा भीषण अपघात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झाला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हा साखरखेर्डा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी असून दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव माळी येथील गणेश विश्वनाथ मते (वय २८) हा युवक पल्सर (MH 18 CD 6116) वरून लव्हाळ्याकडून साखरखेर्डा येथे येत होता. त्याच वेळी सवडद येथील कारपेंटर अनिल कचरू खोलगाडगे (वय ३०) हा HF Delux (MH Maha 37-9847) वरून सवडदकडे निघाला होता. मोहाडी फाट्यानजीकच्या उतारावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले.स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना चिखली येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गणेश मते याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनिल खोलगाडगे याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत गणेश मते हा मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडर म्हणून नोकरी करत होता. दिवसा देऊळगाव माळी येथे पानठेला चालवून रात्री नोकरी करणे अशा प्रकारे तो कुटुंबाचा सांभाळ करत होता.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व दोन्ही वाहने जप्त केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

📢 ताज्या स्थानिक बातम्यांसाठी आमचे पोर्टल लगेच भेट द्या:

👉 महाराष्ट्रातील नंबर 1 विश्वासार्ह ग्रामीण बातम्या — KattaNews.in

📌 संबंधित बातम्या (Related News)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!