हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा पोलीस हद्दीत एका रात्रीत ४ ठिकाणी घरफोडी – ४ लाखांचे दागिने लंपास | Sakharkherda Crime Update

On: November 20, 2025 7:26 AM
Follow Us:
Sakharkherda Crime Update

साखरखेर्डा/प्रतिनिधी

Sakharkherda Crime Update : साखरखेर्डा परिसरात एका रात्रीत झालेल्या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेवर Sakharkherda Crime Update नुसार चोरट्यांनी ४ लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
सध्या या घटनेचा तपास जोरात सुरू असून पोलीस विविध ठिकाणी तपास करत आहेत. या चोरीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून टीमने दिलेल्या माहितीनुसार ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली.
फॉरेन्सिक व श्वानपथक पाचारण करण्यात आले असून sakharkherda police या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत आहे.

साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत शिंदी येथे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका घरातून सोन्याचे दागिने चोरी केले. शरद पंढरीनाथ खरात यांच्या घराच्या मागच्या बाजूने
कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेल्या दागिन्यांमध्ये एक तोळा पोत, एक तोळा गहू मन्याची पोत, १२ तोळे सोने असा ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

आजच्या बाजार भावानुसार चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत ४ लाखांच्या आसपास आहे. शरद खरात यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच अशोक खरात यांनी ठाणेदार गजानन करेवाड यांना कळवले व त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

श्वानपथक, फॉरेन्सिक टीम व फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांनी घटनास्थळी तपास करून
महत्वाचे फिंगरप्रिंट जमा केले. त्याचदरम्यान जिवन खरात यांच्या शेतातील बखारीत दारूची बाटली आढळली जी पोलिसांनी जप्त केली. याशिवाय भगवान वामन बंगाळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडण्याचा प्रयत्न झाला तर मंगेश बंगाळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडलेला आढळला.

या सर्व चोरीच्या प्रयत्नांमुळे गावात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन राजे जाधव करीत आहेत.

👉 ताज्या ब्रेकिंग न्यूजसाठी KattaNews.in ला भेट द्या
 
 
 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment