हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करा; साखरखेर्डा येथे पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

On: August 24, 2026 5:54 PM
Follow Us:
साखरखेर्डा येथे कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

साखरखेर्डा, बुलढाणा : समाधान सरकटे 

आगामी कावड यात्रा आणि ईद मिलाद सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. दोन्ही सण उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी नागरिकांनी सजग राहावे तसेच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले.

साखरखेर्डा नगरीतून सोमवार, २४ ऑगस्ट रोजी कावड यात्रा निघणार आहे. या यात्रेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गावरूनच मिरवणूक काढावी, असे बैठकीत सांगण्यात आले. यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत किंवा वाद निर्माण होईल अशी गाणी वाजवू नयेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.

कोणाकडूनही अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न होत असल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. संबंधित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक समाजातील नागरिकांनी सण-उत्सव साजरे करताना एकमेकांना सहकार्य करून सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. साखरखेर्डा हे शांतता आणि सामाजिक एकोपा जपणारे गाव असून कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत पार पडतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी ईद मिलादनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सण-उत्सव शांततेत साजरे करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत माजी सैनिक अर्जुन गवई, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे आणि अस्लम अंजूम यांनीही आपले विचार मांडले.

शांतता कमिटीच्या बैठकीला ठाणेदार युवराज रबडे, माजी सरपंच कमलाकर गवई, उल्हास देशपांडे, सुनील जगताप, गोपाल राजपूत, शुभम राजपूत, रामदाससिंग राजपूत, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, इब्राहिम शहा, माजी सरपंच दाऊद कुरेशी, अन्नसार कुरेशी, असलम शहा, आयुब कुरेशी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

कावड यात्रा आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्ड्यात पोलिस प्रशासनाने शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी अफवा किंवा वादाला बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📲 KattaNews WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group Join करा

📰 संबंधित बातम्या

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या

जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार चाकूने हत्या; सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुका हादरला

भानगुरा जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षिकेची मागणी

महिला शिक्षिकेची मागणी; भानगुरा शाळेत शिक्षकपदाचा प्रश्न ऐरणीवर, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

Leave a comment