चिखली, बुलढाणा : विशाल गवई
(Buldhana News) चिखली शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. रात्रीच्या पेट्रोलिंगदरम्यान चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. ईश्वर प्रकाश धनवटे (वय 25, रा. गौरक्षणवाडी, चिखली) याच्याकडून अंदाजे ₹45 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!
बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2026 रोजी रात्री चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी पोलीस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत ईश्वर धनवटे हा अग्नीशस्त्र जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नमूद इसमाचा शोध सुरू केला. त्यावेळी ईश्वर धनवटे हा संभाजीनगर, चिखली येथील गोपाल किराणा दुकानासमोरून पायी जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी रात्री सुमारे 12 वाजून 50 मिनिटांनी त्याला थांबवून त्याचे नाव व पत्ता विचारला.
त्यानंतर पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला एक पिस्टल आढळून आले. पोलिसांनी हे अग्नीशस्त्र ताब्यात घेतले. पाहणी केली असता ते देशी बनावटीचे पिस्टल असल्याचे आढळून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिस्टलच्या हॅन्डलवर काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप असून त्यावर दोन्ही बाजूंना गोल्डन रंगातील पंचकोनी स्टारचे चिन्ह आहे. मॅग्झीनसह या पिस्टलची अंदाजे किंमत ₹45 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम 3 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई, बकल नंबर 2261, करीत आहेत.
ही कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, निलेश सावळे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ललिता खरात आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले यांचा सहभाग होता.
चिखली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील पोलिसांची कारवाई पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
📰 Related News
बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारी, पोलीस कारवाई आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्यांसाठी KattaNews वरील Buldhana News विभागाला भेट द्या.
📲 हे पण वाचा..
- साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा हैदोस! दिवसाढवळ्या घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; सवडद, पिंपळगाव सोनारा, हिवरा आश्रमात धुमाकूळ
- लोणार शहरात भरदिवसा धाडसी चोरी; चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले अन् काही मिनिटांतच स्कॉर्पिओची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार
- रोखताना बेफाम टिप्पर अन् तहसीलदारांनाच चिरडण्याचा प्रयत्न? अंढेरा फाट्यावर नेमकं काय घडलं?










