वाशिम|१७ जानेवारी २०२६
रिसोड तालुक्यातील घोटा ग्रामपंचायतीत मनरेगा घोटाळा उघडकीस आला असून,
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा
गंभीर आरोप करण्यात आला आहे. रिसोड मनरेगा घोटाळा प्रकरणात आधीच पूर्ण असलेली विहीर
नवीन काम म्हणून दाखवून शासनाचा निधी उचलण्यात आल्याचे समोर आले आहे.
या कामासाठी २५ हजार रुपयांची लाच घेऊन बनावट मस्टर काढल्याचा
धक्कादायक आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
रिसोड तालुक्यातील घोटा ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा योजनेत,
शेतकरी श्री. राहुल माणिक मोरे यांच्या शेतातील विहीर ही योजनेपूर्वीच
पूर्णपणे खोदलेली व बांधलेली असताना, ती नवीन काम असल्याचे खोटे दाखवून
शासनाकडून निधी उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित रोजगार सेवक आणि PTO यांनी
शेतकऱ्याकडून तब्बल ₹२५,०००/- रुपयांची लाच स्वीकारून
बनावट मस्टर काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती असूनही
घोटा ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनरेगा योजनेचे स्पष्ट नियम असताना, आधीच अस्तित्वात असलेल्या विहिरीवर
नवीन काम दाखवून निधी उचलणे म्हणजे थेट शासनाची फसवणूक असून,
हा प्रकार शासकीय नियमांचे उल्लंघन, आर्थिक गैरव्यवहार व पदाचा गैरवापर
असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.
हे पण वाचा..
वाशिम जिल्ह्यात अवैध सावकारीवर दणका! रिसोडमध्ये दोन ठिकाणी धडक छापे
या संदर्भात तक्रारदाराने गटविकास अधिकारी, पंचायत समिती रिसोड यांच्याकडे
लेखी तक्रार दाखल केली असून, रोजगार सेवक, PTO तसेच सरपंच व उपसरपंच
यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच बनावट मस्टर काढून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी
फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणामुळे ग्रामीण भागात मनरेगा योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
निर्माण झाले असून, प्रशासन या आरोपांकडे कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गटविकास अधिकारी गजानन खुळे म्हणाले :
“घोटा येथील या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.”
📌 नागरिकांसाठी आवाहन
मनरेगा योजनेत होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.
तुमच्या परिसरातील अशा गैरप्रकारांची माहिती असल्यास
Kattanews.in शी संपर्क साधा.
📰 Related News











