हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाशिम महसूल विभागात खळबळ! 10 हजारांची लाच घेताना तलाठी ACBच्या जाळ्यात

Follow Us:
वाशिममध्ये तलाठी ACB ट्रॅपमध्ये अडकला – 10 हजारांची लाच घेताना कारवाई

वाशिम | १६ जानेवारी २०२६

वाशिम जिल्ह्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून मंगरूळपीर येथे तलाठी ACB कारवाईत अडकला आहे. 10 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी रवींद्र रंगनाथ खुळे याला भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे वाशिम लाच प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेली शेतजमीन त्यांच्या नावावर करण्यासाठी तलाठी रवींद्र खुळे याने 15 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ACB वाशिमकडे करण्यात आली होती. पडताळणीअंती तक्रार सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACBने सापळा रचला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ठरल्याप्रमाणे पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये स्वीकारताच ACB पथकाने तलाठ्याला पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत 10 हजारांची लाच रक्कम, 2,760 रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या घरझडतीची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अलका गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, संपूर्ण कारवाईवर पर्यवेक्षण अधिकारी जगदीश परदेशी यांचे मार्गदर्शन होते.


👉 नागरिकांसाठी आवाहन

शासकीय कामासाठी कुणीही लाच मागितल्यास तात्काळ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB वाशिमकडून करण्यात आले आहे.


🔔 हे पण वाचा..


📢 हे आवश्यक करा..

अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि धडक बातम्यांसाठी Kattanews.in फॉलो करा!


 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment